मुन्नाभाई गजाआड
By Admin | Published: January 28, 2017 11:49 PM2017-01-28T23:49:03+5:302017-01-28T23:49:34+5:30
बीड : वैद्यकीय व्यवसायाची बनावट पदवी तयार करून रुग्णांच्या जिवाशी खेळणाऱ्या मुन्नाभाईला अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सकाच्या पथकाने शुक्रवारी पकडले
बीड : वैद्यकीय व्यवसायाची बनावट पदवी तयार करून रुग्णांच्या जिवाशी खेळणाऱ्या मुन्नाभाईला अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सकाच्या पथकाने शुक्रवारी पकडले. शहरातील पेठ बीड भागात ही कारवाई करण्यात आली.
अनिल अमोल वराई (रा. विलास शिवपूर, ता. धामोला, जि. नदीया, कोलकाता, ह. मु. पूनम गल्ली, बीड) असे त्या बोगस डॉक्टराचे नाव आहे. मागील तीन वर्षांपासून तो पेठ बीड भागातील तेली गल्लीत परिमल क्लिनीक नावाने दवाखाना चालवत असे. त्याच्याकडे वैद्यकीय व्यवसायासाठी आवश्यक असलेली कुठलीही पदवी नव्हती. या संदर्भात माहिती मिळाल्यावरून अतिक्ति शल्य चिकित्सक डॉ. संजय पाटील यांनी सायंकाळी छापा टाकला. त्याच्याकडे बनावट पदवी आढळून आली. त्यामुळे त्याच्याविरुद्ध डॉ. पाटील यांनी पेठ बीड ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून फसवणुकीसह भारतीय दंड विधान व कलम ३३ (१) राज्य वैद्यकीय व्यवसाय अधिनियम १९६१ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
तीन दिवसांची कोठडी
आरोपी अनिल वराई याला शनिवारी बीड येथील न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. त्याची कसून चौकशी सुरू असल्याचे निरीक्षक अनिलकुमार जाधव यांनी सांगितले. (प्रतिनिधी)