जीवघेण्या मारहाणीच्या प्रतिकारादरम्यान आईकडून मद्यपी मुलाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2020 05:10 PM2020-11-04T17:10:28+5:302020-11-04T17:12:30+5:30

कुटुंबातील सदस्यांना मारहाण करीत त्यांच्याकडून दारू पिण्यासाठी सतत पैसे घेत होता. 

Murder of an alcoholic child by a mother during a fight against a fatal beating | जीवघेण्या मारहाणीच्या प्रतिकारादरम्यान आईकडून मद्यपी मुलाचा खून

जीवघेण्या मारहाणीच्या प्रतिकारादरम्यान आईकडून मद्यपी मुलाचा खून

googlenewsNext
ठळक मुद्देगंगापूरमधील आसेगावची घटना दौलताबाद ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा 

दौलताबाद :  मारहाणीच्या घटनेत आसेगावात (ता. गंगापूर) आईसह अन्य एकाकडून मुलाचा खून झाल्याची घटना समोर आली आहे. यात कृष्णा शामराव शेळके (३५) याचा खून झाला असून, आरोपीस दौलताबाद पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

कृष्णा सोमवारी दुपारी दारू पिऊन घरी आला होता. यादरम्यान त्याने आईसह पत्नीला मारहाण करण्यास सुरुवात केली. प्रतिकारादरम्यान आईसह अन्य एकाकडून झालेल्या मारहाणीत डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने कृष्णाचा जागीच प्राण गेला. याप्रकरणी कृष्णाची पत्नी वंदना शेळके हिच्या फिर्यादीवरून कृष्णाची आई तुळसाबाई शेळके, पंढरीनाथ बाबूराव जाधव यांच्याविरुद्ध दौलताबाद पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिसांनी कृष्णा शेळकेला बेशुद्धावस्थेत उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यास तपासून मयत घोषित केले. 

व्यसनामुळे जमीन गेली 
कृष्णा शेळकेला दारूचे व्यसन असल्याने कुटुंबातील सदस्य त्याला वैतागले हाेते. त्याच्याकडे साडेतीन एकर जमीन होती. मात्र, दारूच्या आहारी गेल्यामुळे त्याने थोडीथोडी करून आपली जमीन विकण्याचा सपाटा लावला होता. सध्या अवघी २० गुंठे जमीन त्याच्या ताब्यात राहिली होती.  

मारहाण करून पैसे घ्यायचा 
कृष्णा शेळके यास दोन मुले असून, दीपक नववीत, तर दुसरा विशाल सातवीत आहे. दोन्ही मुले सध्या शाळा बंद असल्याने आई व आजीसोबत इतरांच्या शेतात कापूस वेचण्यासाठी जातात. कृष्णा शेळके कामधंदा करीत नसल्याने त्यांच्याकडे पैसे नसायचे. त्यामुळे तो कुटुंबातील सदस्यांना मारहाण करीत त्यांच्याकडून दारू पिण्यासाठी सतत पैसे घेत होता. 

Web Title: Murder of an alcoholic child by a mother during a fight against a fatal beating

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.