लासूर स्टेशन येथे व्यापा-याचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2017 12:26 AM2017-11-15T00:26:52+5:302017-11-15T00:26:56+5:30
लासूर स्टेशन येथे सोमवारी मध्यरात्री वृद्ध व्यापा-याचा धारदार शस्त्राने खून करुन आरोपीने ९० तोळे सोन्याचे, ५ किलो चांदीचे दागिने व अडीच लाख रुपये असा एकूण २८ लाख ८० हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याने गावात घबराट पसरली आहे. केशरचंद उत्तमचंद जाजू (८१, रा. लासूर स्टेशन) असे खून झालेल्या व्यापा-याचे नाव आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
लासूर स्टेशन : लासूर स्टेशन येथे सोमवारी मध्यरात्री वृद्ध व्यापा-याचा धारदार शस्त्राने खून करुन आरोपीने ९० तोळे सोन्याचे, ५ किलो चांदीचे दागिने व अडीच लाख रुपये असा एकूण २८ लाख ८० हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याने गावात घबराट पसरली आहे. केशरचंद उत्तमचंद जाजू (८१, रा. लासूर स्टेशन) असे खून झालेल्या व्यापा-याचे नाव आहे.
केशरचंद जाजू हे मुलगा कैलास व सून यांच्यासोबत येथील शिवाजी महाराज मैदानाजवळ राहत होते. कैलास हे सोमवारी रात्री औरंगाबाद येथून काम आटोपून घरी आले. पत्नी व ते वरच्या मजल्यावर झोपले, तर वडील केशरचंद हे खालच्या मजल्यावर झोपले होते. मंगळवारी सकाळी कैलास जाजू उठले. त्यावेळी त्यांच्या खोलीचा दरवाजा बाहेरून बंद असल्याने त्यांनी त्यांच्या भावाला फोन करून बोलावून घेत दरवाजा उघडून बाहेर आले. त्यांनी तातडीने वडीलांच्या खोलीकडे धाव घेतली. त्यावेळी त्यांना सामान अस्ताव्यस्त पडलेले व तिजोरी उघडी दिसली. वडीलांच्या अंगावर रग होती व शरीर रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडलेले होते.
लगेचच त्यांनी घटनेची माहिती लासूर स्टेशन पोलीस चौकीला दिली. त्यावरून सहायक पोलीस निरीक्षक मिलिंद खोपडे व सहकारी घटनास्थळी दाखल झाले. घटनेचे गांभीर्य ओळखून त्यांनी वरिष्ठ अधिकाºयांना माहिती दिली.
पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह, अप्पर पोलीस अधीक्षक उज्ज्वला वनकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अविनाश सोनवणे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुभाष भुजंग आदींनी घटनास्थळी भेट देऊन आरोपीचा तपास सुरु केला आहे. ठसे तज्ज्ञ, श्वान पथक, विशेष पथकानेही घटनास्थळाची पाहणी केली.