जालन्यात ‘त्या’ सात संशयितांविरुद्ध खुनाचा गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2017 01:01 AM2017-07-21T01:01:21+5:302017-07-21T01:04:27+5:30
जालना: पार्किंगच्या वादातून मारहाण झालेल्या तरुणाच्या मृत्य प्रकरणात सात संशयितांवर चंदनझिरा ठाण्यात बुधवारी रात्री उशिरा खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना: पार्किंगच्या वादातून मारहाण झालेल्या तरुणाच्या मृत्य प्रकरणात सात संशयितांवर चंदनझिरा ठाण्यात बुधवारी रात्री उशिरा खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पैकी सहा संशयितांना पोलिसांनी अटक केली असून, एकाचा शोध सुरू आहे.
पोलीस निरीक्षक योगेश गावडे यांनी सांगितले, की जालना-औरंगाबाद रस्त्यावरील एका हॉटेलसमोर रिक्षा पार्किंगच्या वादातून सय्यद नासेर सय्यद इसाक (३१) या युवकास पाच ते सहा जणांनी मारहाण केली होती. मारहाणीत गंभीर जखमी सय्यद नासेर याचा मंगळवारी रात्री मृत्यू झाला. या प्रकरणी चंदनझिरा पोलीस ठाण्यात दाखल मारहाणीच्या गुन्ह्यातील संशयित आरोपी आशिष अंकुश राऊत, नारायण शेषराव गौड, शंकर लक्ष्मण पवार, हरिभाऊ त्र्यंबक राऊत, राजू विठ्ठल घुगे, प्रभू अंकुश बावणे यांना पोलिसांनी या पूर्वीच अटक केली आहे.
सर्व संशयित सध्या न्यायालयीन कोठडीत असून, त्यांच्याविरुद्ध आता खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, मंगळवारी रात्री गंभीर जखमी सय्यद नासेर याचा मृत्यू झाल्यानंतर शहरात तणाव निर्माण झाला होता.