‘त्या’ विवाहितेची आत्महत्या नव्हे हत्या !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2017 12:22 AM2017-07-28T00:22:54+5:302017-07-28T00:22:54+5:30

बीड :प्राथमिक तपासणीत पतीने प्रथमत: पत्नीचा गळा आवळून खून केला व त्यानंतर विष प्राशन केल्याचे पोलीस तपासात समोर आले.

murder, not suicide | ‘त्या’ विवाहितेची आत्महत्या नव्हे हत्या !

‘त्या’ विवाहितेची आत्महत्या नव्हे हत्या !

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : शहरातील जवाहर कॉलनीतील एका घरामध्ये पुनम भागवत जाधव (३०) या विवाहितेचा मृतदेह बुधवारी दुपारी आढळून आला होता. तर तिचा पती शहरातील खंडेश्वरी भागात विष प्राशन केलेल्या अवस्थेत मिळून आला होता. प्राथमिक तपासणीत पतीने प्रथमत: पत्नीचा गळा आवळून खून केला व त्यानंतर विष प्राशन केल्याचे पोलीस तपासात समोर आले. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात पतीसह सासुविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पल्लवी जाधव व त्यांचा पती भागवत जाधव हे दोघे शहरातील जवाहर कॉलनीत किरायाच्या घरामध्ये राहत होते. भागवत जाधव याच्या विरूद्ध न्यायालयात एक केस सुरु आहे. त्यासाठी लागणाºया पैशासाठी पल्लीवचा तो छळ करायचा. तसेच तो कर्जबाजारी असल्याचेही पोलीस तपासात समोर आले आहे. मयत पल्लवीचे वडील-भाऊ व नातेवाईकांच्या संमतीने जिल्हा रूग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर शिवाजी नगर ठाण्यात पती भागवतसह सासू गयाबाई जाधव विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
दरम्यान, भागवतची प्रकृती चिंताजनक असून, जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तो बोलत नसल्याने जवाब घेता आला नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title: murder, not suicide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.