कुत्र्यांच्या तावडीतून वाचविले मोराचे प्राण
By Admin | Published: July 25, 2016 12:49 AM2016-07-25T00:49:14+5:302016-07-25T01:06:44+5:30
औरंगाबाद : इंदिरानगर, बायजीपुरा परिसरात रविवारी सकाळी दोन-चार कुत्रे एका पक्ष्याचा पाठलाग करताना काही नागरिकांनी पाहिला.
औरंगाबाद : इंदिरानगर, बायजीपुरा परिसरात रविवारी सकाळी दोन-चार कुत्रे एका पक्ष्याचा पाठलाग करताना काही नागरिकांनी पाहिला. एक जखमी मोर (लांडोर) कुत्र्यांपासून जीव वाचवण्यासाठी धडपडत होती. मॉर्निंग वॉकसाठी निघालेल्या नागरिकांनी कुत्र्यांना हाकलून लावले. नगरसेवक कैलास गायकवाड, रमेश जायभाये, सुनील रत्नपारखी यांंनी वन विभागाला माहिती दिली. त्यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी रत्नाकर नागापूरकर यांनी एस. आर. मोरे, वनपाल पी. डी. सूर्यवंशी, वनरक्षक ए. डी. तागड, दयानंद आर्सूड, सांगळे यांना घटनास्थळी पाठविले. कर्मचाऱ्यांनी मोरास डॉक्टरांकडे नेले.
भरारीनंतर त्यास दम लागला असावा, दुसरी भरारी घेण्याअगोदर त्याच्यावर कुत्र्यांनी हल्ला केला असावा, असे तर्कवितर्क लावले जात होते. मोराची प्रकृती सुधारल्यावर त्यास वन क्षेत्रात सोडण्यात येईल.