परभणी जिल्ह्यात मुसळधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2017 12:06 AM2017-09-10T00:06:46+5:302017-09-10T00:06:46+5:30
जिल्ह्याला शुक्रवारी रात्री मुसळधार पावसाने झोडपले़ या पावसामुळे परभणी तालुक्यातून वाहणाºया दुधना नदीला पूर आला़ पुराचे पाणी शेत जमिनींमध्ये घुसल्याने पिकांचे नुकसान झाले़ जिल्ह्यात जिंतूर तालुक्यामध्ये जिंतूर मंडळात सर्वाधिक १०० मिमी (४ इंच) पाऊस झाला आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : जिल्ह्याला शुक्रवारी रात्री मुसळधार पावसाने झोडपले़ या पावसामुळे परभणी तालुक्यातून वाहणाºया दुधना नदीला पूर आला़ पुराचे पाणी शेत जमिनींमध्ये घुसल्याने पिकांचे नुकसान झाले़ जिल्ह्यात जिंतूर तालुक्यामध्ये जिंतूर मंडळात सर्वाधिक १०० मिमी (४ इंच) पाऊस झाला आहे़
यावर्षीच्या पावसाळ्यात शुक्रवारी सर्वदूर मोठा पाऊस झाला़ रात्री साधारणत: ११ वाजेच्या सुमारास पावसाला प्रारंभ झाला़ विजांच्या कडकडाटासह झालेल्या या पावसामुळे काही तासांमध्येच जिकडे तिकडे पाणीच पाणी झाले होते़ दोन आठवड्यांच्या खंडानंतर झालेल्या पावसामुळे नागरिकांत समाधान व्यक्त केले जात आहे़ जिंतूर तालुक्यात सरासरी ३८़१७ मिमी पाऊस झाला आहे़ तालुक्यात सहा मंडळे असून, जिंतूर मंडळात सर्वाधिक १०० मिमी, सावंगी म्हाळसा ३४, बोरी ४७, चारठाणा १५, आडगाव बु़ २३ आणि बामणी मंडळात १० मिमी पाऊस झाला़
परभणी तालुक्यात झरी मंडळात अतिवृष्टी झाली आहे़ झरी मंडळात ७१ मिमी पाऊस झाला आहे़ तालुक्यात सरासरी ४९़१३ मिमी पावसाची नोंद झाली़ पालम तालुक्यात ६ मिमी, पूर्णा तालुक्यात १६़६० मिमी, गंगाखेड तालुक्यात ९ मिमी, सोनपेठ ५२ मिमी, सेलू ५७ मिमी, पाथरी ३७ मिमी आणि मानवत तालुक्यात ५२ मिमी पाऊस झाला आहे़ जिल्हाभरात सरासरी ३५़२१ मिमी पावसाची नोंद झाली आहे़
दूधना नदीला पूर
४सेलू तालुक्यात झालेल्या पावसामुळे परभणी तालुक्यात दूधना नदीला पूर आला होता़ तालुक्यातील कारला, कुंभारी आदी गाव परिसरामध्ये नदीचे पात्र दुथडी भरून वाहत होते़ या भागात पुराचे पाणी अनेक शेतकºयांच्या शेतात घुसल्याने पिकांचे नुकसान झाले आहे़