विद्यापीठाच्या अधिसभेवर मस्के, लाखे, असोरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:02 AM2021-08-29T04:02:27+5:302021-08-29T04:02:27+5:30
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ स्थायी समितीच्या बैठकीत अधिसभा सदस्यांच्या तीन जागांवर डॉ. राजकुमार मस्के, शिवराज लाखे, ...
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ स्थायी समितीच्या बैठकीत अधिसभा सदस्यांच्या तीन जागांवर डॉ. राजकुमार मस्के, शिवराज लाखे, डॉ. मनीषा असोरे यांची, तर विविध अभ्यासमंडळ अध्यक्षपदी डॉ. शिवाजी सांगोळे, डॉ. रवी पाटील, डॉ. गणेश साबळे, डॉ. संतोष भोसले यांची तसेच सदस्य यांच्या नामांकनाद्वारे नियुक्त्या देण्यात आल्या आहेत.
तथापि, एकूण १३ अभ्यासमंडळ अध्यक्षपदाच्या जागा नामांकनाद्वारे भरल्या जाणार होत्या; परंतु प्रस्ताव प्राप्त न झाल्यामुळे ९ अभ्यासमंडळे अध्यक्षाविनाच राहिली. तसेच अभ्यासमंडळ सदस्यांच्याही २० ते २५ जागा रिक्त राहिल्या आहेत. आता या नियुक्त सदस्यांना अवघ्या वर्षभराचा कालावधी मिळणार आहे, हे विशेष!
कुलसचिव डॉ. जयश्री सूर्यवंशी यांनी नुकतेच नामांकनाद्वारे झालेल्या नियुुक्त्यासंबंधी परिपत्रक जारी केले आहे. त्यानुसार अधिसभा सदस्यपदी (प्राचार्य प्रवर्गातून) जालना येथील समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजकुमार मस्के, ‘महाविद्यालयीन अध्यापकेतर व्यक्ती’ प्रवर्गातून मत्स्योदरी कला महाविद्यालयाचे अधीक्षक शिवराज लाखे (तीर्थपुरी, जि. जालना) आणि विद्यापीठ ‘अध्यापक-महिला’ प्रवर्गातून विद्यापीठातील शिक्षणशास्त्र विभागप्रमुख डॉ. मनीषा असोरे यांचा समावेश आहे.
याशिवाय हिंदी अभ्यासमंडळ अध्यक्षपदी डॉ. शिवाजी सांगोळे (भोकरदन, जि. जालना), वनस्पतीशास्त्र अभ्यासमंडळ अध्यक्षपदी डॉ. रवी पाटील (औरंगाबाद), इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग अभ्यासमंडळ अध्यक्षपदी डॉ. गणेश साबळे (औरंगाबाद), मेकॅनिकल इंजिनिअरिंग अभ्यासमंडळ अध्यक्षपदी डॉ. संतोष भोसले यांची नियुक्ती झाली आहे.
विविध अभ्यासमंडळ सदस्यपदी नियुक्त्या पुढीलप्रमाणे (कंसात अभ्यासमंडळाचे नाव) : महाविद्यालयीन अध्यापक-विभागप्रमुख नसलेल्या प्रवर्गातून डॉ. सुशील बोर्डे (शैक्षणिक प्रशासन), डॉ. नावीद उस सहर अहमद मोहिउद्दीन (शैक्षणिक प्रशासन), डॉ. कनिझ फातेमा मोहम्मद अब्दुल समद (शैक्षणिक मानसशास्त्र), डॉ. ऊर्जित जनार्दन करवंदे (शैक्षणिक मानसशास्त्र), डॉ. संगीता गायकवाड (शैक्षणिक तत्त्वज्ञान), डॉ. शेख हसन (शैक्षणिक तत्त्वज्ञान), डॉ. धनंजय वडमारे (शैक्षणिक तत्त्वज्ञान), डॉ. मीनाक्षी मुलीया (बीपीएड कॉलेजेस), डॉ. मुरलीधर राठोड (बीपीएड कॉलेजेस), डॉ. पंडित गाते (अकाउंटस् अँड अप्लाईड स्टॅटिस्टिक्स). महाविद्यालयातील विषयाचे विभागप्रमुख प्रवर्गातून डॉ. भारत मिमरोट (मानसशास्त्र), डॉ. सय्यद शौकत अली (हिंदी). पदव्युत्तर अध्यापक प्रवर्गातून डॉ. योगेश भादे (लोकप्रशासन), डॉ. अतुल पवार (मानसशास्त्र), डॉ. शाम सर्जे (इंग्रजी), डॉ. काझी नावीद अहमद सिद्दिकी (उर्दू), डॉ. गौतम गायकवाड (शैक्षणिक मानसशास्त्र), डॉ. नलिनी चोंडेकर (शैक्षणिक प्रशासन).
उद्योग-व्यावसायिक संस्था यामधील नामवंत व्यक्ती प्रवर्गातून शेख सलीम अहमद (सिव्हील इंजिनिअरिंग), सय्यद यासर हुसैनी (मेकॅनिकल इंजनिअरिंग), सिद्दिकी सुफियान अझीझ (प्रोसिजरल लॉ अँड प्रॅक्टिकल ट्रेनिंग), डॉ. संभाजी काळे (अर्थशास्त्र). नामवंत उच्च विद्याविभूषित प्रवर्गातून सुनील शिंदे (सिव्हिल इंजिनिअरिंग), सय्यद इरफान सादुल्ला (मेकॅनिकल इंजिनिअरिंग). अनुभवी व्यक्ती प्रवर्गातून मोहम्मद युनूस मोहम्मद युसुफ (सिव्हिल इंजिनिअरिंग), नक्शबंदी सय्यद नूर अल हुसेन (उर्दू). इतर विद्यापीठामधील प्राध्यापक प्रवर्गातून डॉ. वसंत माळी (वनस्पतीशास्त्र), डॉ. मृदुल निळे (लोकप्रकाशन).