मुस्लिम समाजाचा तहसीलवर मोर्चा

By Admin | Published: December 15, 2015 11:36 PM2015-12-15T23:36:12+5:302015-12-15T23:43:03+5:30

मानवत : सोशल मीडियावर अप:शब्द वापरून मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी मुस्लिम समाजबांधवांनी १५ डिसेंबर रोजी येथील तहसील कार्यालयावर मोर्चाचे आयोजन केले होते.

Muslim community's Tehsil Front | मुस्लिम समाजाचा तहसीलवर मोर्चा

मुस्लिम समाजाचा तहसीलवर मोर्चा

googlenewsNext

मानवत : सोशल मीडियावर अप:शब्द वापरून मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी मुस्लिम समाजबांधवांनी १५ डिसेंबर रोजी येथील तहसील कार्यालयावर मोर्चाचे आयोजन केले होते. अप:शब्द वापरणाऱ्या कमलेश तिवारी यांचा निषेध करून समाजबांधवांनी तहसीलदारांना गुन्हा दाखल करण्याच्या मागणीचे निवेदन दिले.
मानवत शहरातील मरकस मस्जिदपासून मंगळवारी सकाळी १०.३० वाजता हा मोर्चा काढण्यात आला. मुस्लिम धर्म गुरू यांच्याकडून मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.
मोर्चा शहरातील मुख्य मार्गाने तहसील कार्यालयावर पोहोचला. तहसीलदार डॉ. संतोष बनकर यांना कमलेश तिवारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीचे निवेदन देण्यात आले.
मुफ्ती मोहमंद इसाक, मौलाना लतीफ हाफीज, मौलाना मुजाहीद, मौलाना हाफेज अकबर, न. प. सदस्य हबीब भडके, नियामत खान, युसूफ बेलदार, मौलाना साजीद सलीम, हाफेज जावेद, बाबू भाई भंगारवाले, आसद खान, जमील चाऊस, सय्यद मुस्ताक, एजाज पठाण, अ‍ॅड. लुकमान बागवान, महेमूद कुरेशी, हाफेज अनिस, मौलाना अब्दुल हमीद, हाफेज असलम, मोहंमद जावेद बागवान, अब्दुल हफीज बागवान, हाफेज मेहराज, हाफेज आयाज, मोईन अन्सारी, सय्यद जमील, शेख आरेफ, अकबर अन्सारी, पाशा पठाण, मौलाना मुफ्ती महंमद इब्राहीम यांच्यासह पेडगाव, पाळोदी, ताडबोरगाव येथील मुस्लिम बांधव सहभागी झाले होते. यावेळी पोलिस निरीक्षक महेश शर्मा यांनी पोलिस बंदोबस्त ठेवला होता. (वार्ताहर)

Web Title: Muslim community's Tehsil Front

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.