गुंतवणुकीसाठी म्युच्युअल फंड योग्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2018 12:34 AM2018-02-02T00:34:44+5:302018-02-02T00:34:55+5:30

जीवनातील गरजा पूर्ण करण्यासह निवृत्तीनंतर आरामदायी आयुष्य जगण्यासाठी म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणे सर्वात योग्य पर्याय असल्याचे गुंतवणूक इच्छुकदारांनी मान्य केले. म्युच्युअल फंडात आजच गुंतवणूक करण्याचा निर्धारही सर्वांनी केला.

Mutual fund suitable for investment | गुंतवणुकीसाठी म्युच्युअल फंड योग्य

गुंतवणुकीसाठी म्युच्युअल फंड योग्य

googlenewsNext
ठळक मुद्देउदंड प्रतिसाद : लोकमत आणि आदित्य बिर्ला सनलाईफतर्फे मार्गदर्शन शिबीर

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : जीवनातील गरजा पूर्ण करण्यासह निवृत्तीनंतर आरामदायी आयुष्य जगण्यासाठी म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणे सर्वात योग्य पर्याय असल्याचे गुंतवणूक इच्छुकदारांनी मान्य केले. म्युच्युअल फंडात आजच गुंतवणूक करण्याचा निर्धारही सर्वांनी केला.
प्रसंग होता, ‘लोकमत’ आणि ‘आदित्य बिर्ला सनलाईफ म्युच्युअल फंड’ यांच्यातर्फे बुधवारी आयोजित विशेष मार्गदर्शन शिबिराचे. म्युच्युअल फंडविषयी अधिकची माहिती जाणून घेण्यास शहरवासीयांमध्ये प्रचंड उत्सुकता असल्याची प्रचीती यानिमित्ताने आली. रेल्वेस्टेशन रोडवरील व्हिटस् हॉटेलमधील हॉल संपूर्ण भरला होता. जागा न मिळाल्याने तेवढेच लोक हॉलबाहेर उभे होते. यात कॉलेजच्या विद्यार्थ्यांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वजण सहभागी झाले होते. प्रत्येकाच्या मनात आपल्या कमाईतील पैसा सुरक्षित व योग्य ठिकाणी गुंतवणूक करण्याची प्रबळ इच्छा होती. ही इच्छा शिबिरात अनेकांनी व्यक्त करून दाखविली. आदित्य बिर्ला सनलाईफ मालमत्ता व्यवस्थापनाचे प्रादेशिक प्रमुख प्रशांत गुप्ता यांनी सांगितले की, आपण कमावलेल्या पै-पै पैशाची कोणाच्या सांगण्यावर किंवा अर्धवट माहितीवर डोळे झाकून कुठेही गुंतवणूक करूनका. गुंतवणूक करण्यापूर्वी आपण आपल्या जीवनातील गरजा ओळखा, त्यात प्राथमिकतेनुसार त्या गरजांची गटवारी तयार करा. त्यानुसार आर्थिक नियोजन करा. गुंतवणुकीची सुरुवात लवकर करा. जेवढे लवकर तुम्ही गुंतवणूक कराल तेवढा फायदा तुम्हाला मिळेल. सध्या नोकरीचा काही भरोसा राहिलेला नाही. तसेच आता खाजगी क्षेत्रात सोडाच पण सरकारी नोकरीतही निवृत्तीवेतन मिळणार नाही. यामुळे निवृत्तीनंतरच्या आयुष्यात पैशाची टंचाई जाणवू द्यायची नसेल, तर ‘म्युच्युअल फंड’ शिवाय दुसरा सर्वोत्तम पर्याय नाही. हे त्यांनी ‘विविध व्हिडिओ क्लिप’ व उदाहरणाद्वारे उपस्थितांना पटवून दिले. ‘म्युच्युअल फंड’ म्हणजे काय आहे. मागील २० वर्षांत यात गुंतवणूक करणाºयांना किती लाभ झाला याची सविस्तर माहिती प्रशिक्षक नीलरत्न चौबळ यांनी दिली. त्यांनी सांगितले की, गुंतवणूक करताना तुम्हाला जोखीम घ्यावीच लागेल. म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करणे हे जोखमीचे आहे, असे स्पष्ट सांगितल्या जाते हेच यातील ‘पारदर्शकता’ असल्याचे त्यांनी नमूद केले. म्युच्युअल फंडात गुंतवणूक करून तुम्ही तुमच्या गुंतवणुकीचे विकेंद्रीकरण करू शकता. शिवाय जोखीमदेखील थोडी कमी होते याची सविस्तर माहिती त्यांनी दिली.
म्युच्युअल फंडात गुंतवणूक वैविध्यपूर्ण
४म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक ही अनेक जागी केल्या जाते. म्हणून गुंतवणूक ही वैविध्यपूर्ण असते. त्यामुळे धोका कमी होतो. समजा तुमची पूर्ण गुंतवणूक एकाच प्लॉटमध्ये आहे. किंवा एकाच कंपनीच्या शेअरमध्ये आहे. फक्त सोन्यातच आहे, अशा वेळेस किमती कमी झाल्यास मोठे नुकसान होते. या उलट जर तुमची गुंतवणूक वैविध्यपूर्ण असेल आणि एका गुंतवणुकीवर संकट आले, तर तुमचे जास्त नुकसान होणार नाही. झालेले नुकसान दुसरी गुंतवणूक भरूनही काढू शकते. हेच म्युच्युअल फंडचे वैशिष्ट्य असल्याचे प्रशांत गुप्ता यांनी सांगितले.

Web Title: Mutual fund suitable for investment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.