‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’; औरंगाबादेत आजपासून प्रत्येक घरात जाऊन आरोग्य तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2020 02:03 PM2020-09-15T14:03:33+5:302020-09-15T14:06:22+5:30
जिल्ह्यातील ९ लाख कुटुंबांची होणार पाहणी
औरंगाबाद : ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या उपक्रमांतर्गत मंगळवारपासून शहरातील प्रत्येक घरी जाऊन महापालिकेचे कर्मचारी नागरिकांच्या आरोग्याची तपासणी करणार आहेत. कोविडची कोणतीही लक्षणे दिसल्यास संबंधिताला त्वरित उपचार देण्यात येणार आहेत. या कामासाठी महापालिकेने ३४५ पथके नेमली आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी सायंकाळी या मोहिमेचा व्हिडिओ कॉन्फरन्सिंंगद्वारे प्रत्येक जिल्ह्याचा आढावा घेतला.
मोहीम कालावधीत गृहभेटी देण्यासाठी आरोग्य पथके तयार करणे, ताप, खोकला, दम लागणे अशी कोविडसदृश लक्षणे असणाऱ्या व्यक्तींना जवळच्या फीवर क्लिनिकमध्ये पाठविणे, घरातील सर्व सदस्यांना प्री कोविड, कोविड आणि पोस्ट कोविड परिस्थितीनुसार आरोग्य संदेश समजावून सांगणे यासारख्या गाईडलाईन्स शासनाने मोहिमेदरम्यान राबविण्याच्या सूचना दिल्या आहेत.
आगामी ७ दिवसांत ४ हजार रुग्णांची भर पडू शकतेhttps://t.co/RYC58PIXt1
— Lokmat Aurangabad (@milokmatabd) September 15, 2020
जिल्ह्यातील ९ लाख कुटुंबांची होणार पाहणी
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावावर नियंत्रण मिळावे, यासाठी विविध माध्यमांतून प्रयत्न सुरू आहेत. त्याअनुषंगानेच ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही मोहीम राबविण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील ९ लाख कुटुंबांची पाहणी यात करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिली. १५ सप्टेंबरपासून ही मोहीम सुरू होणार असून, यामध्ये घरोघरी जाऊन आरोग्याबाबतीत पाहणी केली जाईल. पाहणीत दोन कर्मचाऱ्यांचे व स्वयंसेवकांचे एक पथक असेल. हे पथक एका दिवसात ५० घरांना भेटी देईल. त्यामध्ये घरातील लोकांना काय आजार आहेत, याची माहिती गोळा केली जाणार आहे. कुटुंबांतील सदस्याला ताप तसेच छातीचे काही आजार आहेत का याची माहिती संकलित केली जाणार आहे. १५ सप्टेंबर ते १० आॅक्टोबरदरम्यान पहिला तर १२ ते २४ आॅक्टोबर काळात दुसऱ्या टप्प्यातील मोहीम राबविण्यात येईल.
बँक व्यवहाराचे मेसेज खातेदाराच्या मोबाईलवर येणे बंद झाले.https://t.co/e3peuOUK94
— Lokmat Aurangabad (@milokmatabd) September 15, 2020
होम आयसोलेशनबाबत अहवालाची मागणी
कोरोनाची रुग्णसंख्या पाहता होम आयसोलेशनच्या सूचना मुख्य सचिवांनी दिल्या होत्या. त्यानंतर जिल्हाधिकारी चव्हाण यांनी अधिष्ठाता, मनपा आरोग्य अधिकाऱ्यांना याबाबतच्या धोरणासंदर्भात दोन दिवसांत अहवाल देण्याची सूचना दिली आहे. सध्या २५ हॉस्पिटल्सच्या माध्यमातून होम आयसोलेशनमध्ये उपचार केले जातात. १ हजार ७० रुग्णांवर सध्या उपचार करण्यात येत आहेत. अहवाल आल्यानंतर बैठक होईल, त्यानंतर पुढील निर्णय होईल.