"माझे कुटुंब ..माझी जबाबदारी" सर्व्हेच्या मोबदल्यापासून आशा वर्कर्स वंचित!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:05 AM2021-03-07T04:05:56+5:302021-03-07T04:05:56+5:30
संघटनेच्या सरचिटणीस कॉ. मंगल ठोंबरे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने यासंदर्भात मनपा आयुक्तांना निवेदन दिले आहे. त्यात विविध मागण्यांचा समावेश आहे. ...
संघटनेच्या सरचिटणीस कॉ. मंगल ठोंबरे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने यासंदर्भात मनपा आयुक्तांना निवेदन दिले आहे. त्यात विविध मागण्यांचा समावेश आहे.
माझे कुटुंब माझी जबाबदारीच्या सर्व्हेचे प्रतिदिन १५० रुपयेप्रमाणे मोबदला मिळायला हवा. परंतु, निधी आला नाही असे कारण सांगून टाळाटाळ करण्यात येत असल्याचे ठोंबरे यांनी सांगितले.
सर्व आशा वर्कर्सना महापालिका सेवेत सामावून घेण्यात यावे,नोव्हेंबर -डिसेंबर -जानेवारीचे वाढीव दोन हजार रुपये मानधन त्वरित वाटप करण्यात यावे, महापालिकेने कोरोनाकाळात दिलेल्या एक हजार रुपये मानधनाचे वाटप करण्यात यावे, क्षयरोग कुष्ठरोग सर्वेचे मानधन जमा करण्यात यावे आदी मागण्यांचे निवेदन मनपा आयुक्तांना सादर केले. निवेदनावर दामोदर मानकापे, पुष्पा शिरसाठ, मंगल मोरे, पुष्पा पैठणे, ज्योती अवचरमल, सुनिता गांगवे, सुनिता दाभाडे, शोभा काळे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.