म्युकरमायकोसिसने घेतला ११५ जणांचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:02 AM2021-06-18T04:02:21+5:302021-06-18T04:02:21+5:30

औरंगाबाद : कोरोनापाठोपाठ म्युकरमायकोसिसच्या (बुरशीजन्य) आजाराने फास आवळला असून, आजपर्यंत ११५ रुग्णांचा बळी या आजाराने घेतले आहे. एक हजारांपर्यंत ...

Myocardial infarction claimed 115 lives | म्युकरमायकोसिसने घेतला ११५ जणांचा बळी

म्युकरमायकोसिसने घेतला ११५ जणांचा बळी

googlenewsNext

औरंगाबाद : कोरोनापाठोपाठ म्युकरमायकोसिसच्या (बुरशीजन्य) आजाराने फास आवळला असून, आजपर्यंत ११५ रुग्णांचा बळी या आजाराने घेतले आहे. एक हजारांपर्यंत रुग्णसंख्येचा आकडा गेला असून, अडीचशे रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.

बुधवारी नव्याने १३ रुग्ण आढळून आल्याने म्युकरमायकोसिसच्या आजाराच्या रुग्णांची संख्या १००७ इतकी झाली. ६११ रुग्ण उपचार घेऊन बरे झाले असून, २८१ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. आतापर्यंत घाटी रुग्णालयात २०७, एमजीएम १८९, एमआयटी १३६, डॉ. हेडगेवार हॉस्पिटल ९४, युनायटेड सिग्मा हॉस्पिटल ५८, अ‍ॅपेक्स सुपरस्पेशालिटी १०४, मेडीकव्हर हॉस्पिटल ६६, एशियन हॉस्पिटल ४४, देशमुख इन्स्टिट्युट २०, जिव्हाळा हॉस्पिटल १३, ऑरियन सिटीकेअर सुपर स्पेशॅलिटी हॉस्पिटल १५, कमलनयन बजाज हॉस्पिटल ३१, धूत हॉस्पिटलमध्ये १२ रुग्णांवर उपचार करण्यात आल्याचे मनपा प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

Web Title: Myocardial infarction claimed 115 lives

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.