गूढ उलगडेनाच !

By Admin | Published: May 23, 2016 11:26 PM2016-05-23T23:26:35+5:302016-05-23T23:30:51+5:30

बीड : जिल्ह्यात मागील पाच दिवसांत चार अनोळखी मृतदेह आढळले. बीड तालुक्यात दोन, तर पाटोदा व अंबाजोगाई तालुक्यात प्रत्येकी एक मृतदेह आढळला होता.

Mystery hidden! | गूढ उलगडेनाच !

गूढ उलगडेनाच !

googlenewsNext

बीड : जिल्ह्यात मागील पाच दिवसांत चार अनोळखी मृतदेह आढळले. बीड तालुक्यात दोन, तर पाटोदा व अंबाजोगाई तालुक्यात प्रत्येकी एक मृतदेह आढळला होता. यापैकी एकाचीही ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले नाही. त्यांच्या मृत्यूचे गूढ अद्याप उलगडलेले नाही. त्यामुळे पोलिसांसमोर आव्हान कायम आहे.
१९ मे रोजी एकाच दिवशी तीन अनोळखी मृतदेह आढळले होते. बीड शहरातील अशोकनगर भागातील हिना पेट्रोल पंपासमोर ३५ वर्षीय तरूणाचा, तर बीड तालुक्यातील बेलुरा शिवारात ६० वर्षीय वृद्धाचा मृतदेह आढळला होता. त्याच दिवशी पाटोदा तालुक्यातील काकडहिरा येथे गिन्यानदेव नागरगोजे यांच्या शेतात जळालेली मानवी कवटी व हाडे आढळून आली होती. हा मृतदेह पुरूषाचा की महिलेचा हे देखील अद्याप समोर आलेले नाही. काकडहिरा प्रकरणी अज्ञात व्यक्तीच्या खून प्रकरणी अज्ञात आरोपीविरूद्ध गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.दरम्यान, मानवी कवटी व हाडे आढळल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे. निरीक्षक आदिनाथ रायकर म्हणाले, धागेदोरे शोधण्याचा प्रयत्न असून, खूनाचे रहस्य शोधण्यात येईल.
या तीन घटना ताज्या असतानाच शुक्रवारी अंबाजोगाई-परळी रस्त्यावर एका अनोळखी वृद्धेचे बेवारस प्रेत आढळले. महिलेच्या अंगातील वेशभूषेवरून ती मनोरूग्ण असावी, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला. आकस्मिक मृत्यूची नोंद झाली असून, तिचे शव स्वाराती रूग्णालयातील शवागृहात ठेवले आहे. अद्याप तिची ओळख पटलेली नाही, असे निरीक्षक सोमनाथ गीते यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. (प्रतिनिधी)
ओळख पटेना : त्या दोघांवर अंत्यसंस्कार
बीड शहरातील अशोकनगर भागात आढळलेल्या तरूणाच्या मृतदेहाची व बेलुरा शिवारात मिळून आलेल्या वृद्धाच्या मृतदेहाची तीन दिवस ओळख पटली नाही. दोन्ही मृतदेह जिल्हा रूग्णालयातील शवागृहात नातेवाईकांच्या प्रतिक्षेत होते. ओळख न पटल्याने अखेर पेठबीड व ग्रामीण पोलिसांनी नगरपालिकेला कळवून त्या दोघांच्या अंत्यसंस्काराचे सोपस्कार पार पाडले.

Web Title: Mystery hidden!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.