ना गाजावाजा... ना पुरस्काराची हाव, उज्ज्वल भविष्यासाठी राबतेय गाव!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2018 12:22 AM2018-05-21T00:22:30+5:302018-05-21T00:22:50+5:30

वज्रमूठ आवळली : वावन्यात उद्दिष्टापेक्षा अधिक कामे; गावशिवार ‘पाणीदार’ करण्याची जिद्द, पावसाळ्यात होणार श्रमदान सार्थक

 Na Gajwaza ... neither the award of the award, the village for the bright future! | ना गाजावाजा... ना पुरस्काराची हाव, उज्ज्वल भविष्यासाठी राबतेय गाव!

ना गाजावाजा... ना पुरस्काराची हाव, उज्ज्वल भविष्यासाठी राबतेय गाव!

googlenewsNext

रऊफ शेख ।
लोकमत न्यूज नेटवर्क
फुलंब्री : तालुक्यातील अनेक गावांनी वॉटर कप स्पर्धेत भाग घेतला असला तरी यापैकी वावना गावाने आगळावेगळा आदर्श निर्माण करून गावशिवार ‘पाणीदार’ करण्यासाठी वज्रमूठ आवळली आहे. ना गाजावाजा ना पुरस्काराची हाव, केवळ गावाचे भविष्य उज्ज्वल व्हावे, ही एकच जिद्द उराशी बाळगून अख्खे गाव सुरुवातीपासून पाणी फाऊंडेशनच्या कामात उतरले आहे. विशेष म्हणजे वज्रमूठ आणि इच्छाशक्तीच्या बळावर उद्दिष्टापेक्षा जास्तीचे काम वावना ग्रामस्थांनी करून दाखविले आहे. याचा फायदा येणाऱ्या काळात गावाला नक्कीच होईल, या आशेने भर उन्हात श्रमदानासाठी गावचे हात राबत असल्याचे चित्र आहे. गावकरी आता केवळ राहिलेल्या उणिवा दूर करून कामावर शेवटचा हात फिरवत आहेत.
वावना गावची लोकसंख्या अवघी हजार-अकराशेच्या घरात असून, येथे ३८५ हेक्टर जमीन आहे. बहुतांश जमीन कोरडवाहू असून हंगामी बागायतक्षेत्र कमी आहे.
गाव छोटे असले तरी गावचा ‘भाईचारा’ वाखाणण्याजोगा आहे. कुणाच्या घरी कुठलाही समारंभ असला की अख्खे गाव एकत्र येऊन मदत करतात. गावापासून एक कि.मी. अंतरावरील डोंगरावर वैष्णव
देवीचे मंदिर असून शुभकार्याची सुरुवात येथूनच केली जाते. गावात जात-पात, गट-तट नसून केवळ सर्व काही पाणीच असावे, या शिवाय आपली प्रगती नाही, अशी खूणगाठ मनाशी बांधून अख्ख्या
गावाने प्रारंभीपासूनच पाणी फाऊंडेशनच्या कामात आघाडी घेतली आहे.
गेल्या ४५ दिवसांपासून दिवसभर श्रमदान, लोकसहभागातून कामे या विषयावरच चावडी, मंदिर, सार्वजनिक ठिकाणी एकच चर्चा होत आहे. पुरस्कार, बक्षीस मिळावे यापेक्षा या स्पर्धेच्या माध्यमातून गावाचे भविष्य पाणीदार करण्याची संधी दारी चालून आली आहे, याचे आपण सोने करावे, हीच जिद्द वावना गावात पाहायला मिळाली. शेवटी वॉटर कप स्पर्धा राबविणारी परीक्षक टीम वावन्यातील कामांबाबत काय निर्णय घेते, हे पाहणे रंजक ठरणार आहे.
‘बीजेएस’चे सहकार्य
खोलीकरण, शेततळे करण्यासाठी भारतीय जैन संघटनेचे मोठे सहकार्य लाभले. त्यांनी मशिनरी पुरविली, त्याला लागणारे इंधन गावकºयांनी वर्गणी करून दिले. आतापर्यंत दहा लाखांचे इंधन लागले असल्याची माहिती सरपंच सोमीनाथ जाधव यांनी दिली.
कुठलाही स्वार्थ न ठेवता केवळ गावच्या उज्ज्वल भविष्यासाठी गावाचा एकोपा राबत आहे, याचा सार्थ अभिमान आम्हाला आहे, अशा प्रतिक्रिया गावातील नागरिकांच्या तोंडून ऐकायला मिळाल्या. आदर्श, पाणीदार, सुखी व समृद्ध गाव हीच आमची ‘मंझिल’ आहे, असे सरपंच सोमीनाथ जाधव अभिमानाने सांगत होते.
पूर्ण झालेली कामे
वावना गावाच्या सभोवताली दोन नद्या, सुमारे दहा नाले असून याचे खोलीकरण व रुंदीकरण मोठ्या प्रमाणात करण्यात आले. आतापर्यंत १६ कि.मी. लांबीची कामे करण्यात आली असल्याची माहिती गावकºयांनी दिली. यात सुमारे एक लाख ३५ हजार घनमीटर काम झालेले आहे.
याशिवाय ३ हजार ५०० वृक्षांची लागवड, ४०० शेतकºयांकडून माती परीक्षण, यंत्राच्या साह्याने ७२ हजार घनमीटर, श्रमदानातून ६ हजार ६६० घनमीटर, माथा ते पायथा एरिया ट्रीटमेंट ५२ हजार घनमीटर, श्रमदानातून सलग समतल चर, बांध बंदिस्ती, दगडी बांध, यंत्राच्या साह्याने नदी-नाला खोलीकरण, रुंदीकरण, शेततळे आदी कामे पूर्ण झाली आहे.

Web Title:  Na Gajwaza ... neither the award of the award, the village for the bright future!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.