नाफेडचा खरेदी काटा बंद
By Admin | Published: February 24, 2017 12:31 AM2017-02-24T00:31:10+5:302017-02-24T00:32:51+5:30
जालना : कृषी उत्पन्न बाजार समितीतील नाफेडच्या तूर खरेदी केंद्रावर शेतकरी व हमाल यांच्या गुरूवारी दुपारी धक्काबुक्की झाल्याने संतप्त हमालांनी काटे बंद पाडले.
जालना : कृषी उत्पन्न बाजार समितीतील नाफेडच्या तूर खरेदी केंद्रावर शेतकरी व हमाल यांच्या गुरूवारी दुपारी धक्काबुक्की झाल्याने संतप्त हमालांनी काटे बंद पाडले. पोलीस संरक्षण मिळाल्याशिवाय काटे सुरू करणार नाही असा पवित्रा घेतला. दरम्यान काही शेतकऱ्यांनीही गोंधळ घातल्याने एकच गोंधळ उडाला होता.
जालना बाजार समितीत नाफेडचे तूर खरेदी केंद्र आहे. तूर खरेदी करण्यासाठी पाच काटे असून प्रत्येक काट्यावर दहा हमालाची व्यवस्था आहे.गुरूवारी दुपारी काट्यावर मोजमाप करण्यावरून हमाल व शेतकऱ्यांत किरकोळ वाद झाला. यावरून पाचही काट्यावरील खरेदी दुपारपासून बंद करण्यात आली होती. त्यामुळे बाजार समिती शेकडो शेतकऱ्यांची एकच गर्दी झाली होती.
नाफेड अंतर्गत गुरूवार अखेर ५० हजार क्विंटल तुरीची आवक झाली आहे. १५ मार्चपर्यंत ही खरेदी सुरू राहणार असल्याचे नाफेडचे मार्केटिंग आॅफीसर शिवानंद पाटील यांनी सांगितले. नाफेडकडून कोणतीही खरेदी थांबविण्यात आलेली नाही. हमालांच्या वादामुळे खरेदी थांबली आहे. पोलीस बंदोबस्ताची मागणी करण्यात आली आहे. शुक्रवारी खरेदी सुरळीत सुरू होईल. नाफेडच्या खरेदी केंद्रात नाफेडचे तीन कर्मचारी, खरेदी विक्री संघाचे चार, बाजार समितीचे चार व दहा हमला आहेत.