निकृष्ट शौचालय साहित्यावरून शिवसैनिकांचा संताप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2017 12:52 AM2017-07-27T00:52:41+5:302017-07-27T00:53:01+5:30
परभणी : स्वच्छ भारत मिशन अंतर्गत पंचायत समितीच्या माध्यमातून लाभार्थ्यांना देण्यात आलेले शौचालयाचे साहित्य निकृष्ट असल्याच्या व लाभार्थ्यांना अनुदान मिळत नसल्याच्या कारणावरून शिवसैनिकांनी बुधवारी जि़प़ मुख्य कार्यकारी अधिकारी सुशील खोडवेकर यांच्या कक्षात चांगलाच गदारोळ केला व त्यांच्या टेबलवरच हे साहित्य आणून मांडल्याने प्रशासनाची एकच धावपळ उडाली़
लोकमत न्यूज नेटवर्क

स्वच्छ भारत मिशन अंतर्गत जिल्हा परिषदेच्या वतीने लाभार्थ्यांना देण्यात येणाºया शौचालय उभारणीच्या साहित्याचा मुद्दा गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेचा बनला आहे़ या अनुषंगाने बुधवारी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गंगाप्रसाद आणेराव, जि़प़तील गटनेते राम खराबे, जि़प़ सदस्य राजू चापके, माणिकराव घुमरे, प्रभाकर वाघीकर, प्रभाकर जैस्वाल आदींसह शिवसैनिक दुपारी २ च्या सुमारास मुख्य कार्यकारी अधिकारी सुशील खोडवेकर यांच्या कक्षात दाखल झाले़ सोबत त्यांनी शौचालय उभारणीचे आणलेले साहित्य खोडवेकर यांच्या टेबलवर ठेवले व हे साहित्य निकृष्ट दर्जाचे असून, लाभार्थ्यांच्या माथी का मारले जात आहे? असा जाब विचारला, तसेच जिल्ह्यातील ६ हजार ४५५ लाभार्थ्यांना ५ हजार रुपये प्रमाणे जि़प़ने अनुदान दिले़ त्यानुसार त्यांनी वैयक्तीक शौचालय उभारले़ परंतु, या लाभार्थ्यांना पुढील ७ हजार रुपयांचे अनुदान मिळालेच नाही, हे अनुदान का दिले जात नाही, असा जाब विचारला़ यावेळी बराच गदारोळही झाला़ उपस्थित काही लाभार्थ्यांनी शौचालय उभारण्यााठी आलेल्या अडचणी कथन केल्या़ येत्या पाच दिवसांत हे अनुदान न दिल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन केले जाईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला़ यावेळी गुणाजी आवकाळे, नितीन देशमुख, अशोक देशमुख, गोविंद गोसावी, कृष्णा रणेर, सुभाष माने, पांडूरंग रणेर, बाबा सामाले, महेश देशमुख, प्रशांत सुदेवाड आदींची उपस्थिती होती़