नियोजन समितीच्या २४ जागांसाठी ५८ अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2017 12:41 AM2017-07-30T00:41:53+5:302017-07-30T00:41:53+5:30
परभणी : जिल्हा नियोजन समितीच्या २४ जागांसाठी शनिवारपर्यंत ५८ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : जिल्हा नियोजन समितीच्या २४ जागांसाठी शनिवारपर्यंत ५८ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत़
जिल्हा नियोजन समिती ही महत्त्वपूर्ण संस्था असून, या समितीवर सदस्य म्हणून निवड होण्यासाठी लोकप्रतिनिधींची चढाओढ लागली आहे़ २४ जागांसाठी ही निवडणूक होत आहे़ त्यात जिल्हा परिषद गटातून (ग्रामीण गट) १६, नगरपालिका गटातून (लहान नगरी गट) ४ आणि महानगरपालिका गटातून (मोठा नागरी गट) ४ असे सदस्य निवडले जाणार आहेत़ शनिवारपर्यंत एकूण ५८ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत़ त्यामध्ये लहान नागरी गटामधून २३, मोठ्या नागरी गटामधून १० आणि ग्रामीण गटामधून २५ जणांचे अर्ज दाखल झाले़ या पूर्वी २८ जुलै ही अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख होती़ त्यामुळे शुक्रवारी तब्बल ४३ सदस्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले़ मात्र या निवडणुकीतील जागांच्या आरक्षणामध्ये बदल झाला असून, त्यानुसार इतर सदस्यांना संधी मिळावी, या उद्देशाने सोमवारपर्यंत अर्ज दाखल करून घेतले जाणार आहेत़