रांजणगावात नालेसफाई सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:02 AM2021-04-29T04:02:26+5:302021-04-29T04:02:26+5:30
------------------------------ सिडको महानगरात महावितरणचा सावळा गोंधळ वाळूजमहानगर : सिडको वाळूजमहानगरात महावितरणचा सावळा गोंधळ सुरू असल्याने वीज ग्राहक त्रस्त झाले ...
------------------------------
सिडको महानगरात महावितरणचा सावळा गोंधळ
वाळूजमहानगर : सिडको वाळूजमहानगरात महावितरणचा सावळा गोंधळ सुरू असल्याने वीज ग्राहक त्रस्त झाले आहेत. बुधवारी सकाळी ८ वाजेपासून दुपारी ३ वाजेपर्यंत वीजपुरवठा बंद होता. सिडको महानगर परिसरात गेल्या काही दिवसांपासून वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार वाढले आहेत. महावितरणच्या अधिकाऱ्यांकडे तक्रारी करूनही अधिकारी दखल घेत नसल्याने ग्राहकांत असंतोषाचे वातावरण आहे.
----------------------------
सिडकोत झाडे जगविण्यासाठी श्रमदान
वाळूजमहानगर : सिडको वाळूजमहानगरात झाडे जगविण्यासाठी सह्याद्री वृक्ष बँकेच्या पदाधिकाऱ्यांकडून श्रमदान केले जात आहे. महानगर १ मधील प्रवेशद्वाराचे सुशोभीकरण करण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा झाडांना पाणी देऊन गवत काढण्यात येत आहे. याचबरोबर झाडांना वाळवी लागू नये, यासाठी चुना व गेरू देण्याचे कामही वृक्ष बँकेचे पदाधिकारी करीत आहेत.
--------------------------
बजाजनगरात मोकाट जनावरांचा संचार
वाळूजमहानगर : बजाजनगरात मोकाट जनावरांचा संचार वाढल्यामुळे वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांच्या अंगावर ही मोकाट जनावरे धावून जात असल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. या जनावरांचा बंदोबस्त करण्यासाठी ग्रामपंचायत व एमआयडीसी प्रशासन टोलवाटोलवी करीत असल्याची ओरड नागरिकांतून होत आहे.