आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्याचेच नाव शिष्यवृत्तीच्या यादीतून वगळले

By Admin | Published: May 12, 2016 11:59 PM2016-05-12T23:59:51+5:302016-05-13T00:10:36+5:30

समाजकल्याण विभागाच्या कार्यालयाला टाळे ठोकण्याचे आंदोलन करणाऱ्या पीईएस अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या एका विद्यार्थ्यावर समाजकल्याण विभागाने सूड उगविला

The name of the student who agitated was dropped from the scholarship list | आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्याचेच नाव शिष्यवृत्तीच्या यादीतून वगळले

आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्याचेच नाव शिष्यवृत्तीच्या यादीतून वगळले

googlenewsNext

औरंगाबाद : वसतिगृहातून काढून टाकलेल्या एका विद्यार्थ्याच्या मृत्यूनंतर समाजकल्याण विभागाच्या कार्यालयाला टाळे ठोकण्याचे आंदोलन करणाऱ्या पीईएस अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या एका विद्यार्थ्यावर समाजकल्याण विभागाने सूड उगविला असून, या विद्यार्थ्याला मिळणाऱ्या शिष्यवृत्तीच्या यादीतून त्याचे नाव गायब करण्यात आले आहे.
पंकज बाबूराव कांबळे असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. समाजकल्याण विभागातर्फे चालविल्या जाणाऱ्या वेदांतनगरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहातील अकरावीची परीक्षा दिलेल्या ज्ञानेश्वर राठोड या विद्यार्थ्याचा अपघाती मृत्यू झाला. वसतिगृहात राहण्यास परवानगी न दिल्यामुळे राठोड याचा खाजगी काम करीत असताना मृत्यू झाला. या मृत्यूस समाजकल्याण विभागाचे धोरण आणि अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप करून काही कार्यकर्ते आणि विद्यार्थ्यांनी समाजकल्याण विभागाच्या खोकडपुरा येथील कार्यालयाला २९ एप्रिल रोजी टाळे ठोकण्याचे आंदोलन केले. या आंदोलनात (पान २ वर)

Web Title: The name of the student who agitated was dropped from the scholarship list

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.