नाना संतापले, ‘आम्ही भीक मागून बंधाऱ्यांची कामे करू’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2018 12:21 AM2018-08-21T00:21:35+5:302018-08-21T00:23:49+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क औरंगाबाद : कोल्हापुरी बंधा-यांना दरवाजे बसविण्याची कामे पूर्ण करण्यात जि.प. सत्ताधारी आणि प्रशासन कुचकामी असल्याचा अप्रत्यक्ष ...

Nana was angry, 'we will do the work of the beggars' | नाना संतापले, ‘आम्ही भीक मागून बंधाऱ्यांची कामे करू’

नाना संतापले, ‘आम्ही भीक मागून बंधाऱ्यांची कामे करू’

googlenewsNext
ठळक मुद्देहोत नसेल तर सांगा : हरिभाऊ बागडे यांनी जिल्हा परिषद सत्ताधा-यांवर साधला निशाणा; चार वर्षांपासून विषय मांडत असल्याची ‘डीपीसी’ बैठकीत तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : कोल्हापुरी बंधा-यांना दरवाजे बसविण्याची कामे पूर्ण करण्यात जि.प. सत्ताधारी आणि प्रशासन कुचकामी असल्याचा अप्रत्यक्ष शाब्दिक हल्ला चढवित, होत नसेल तर आम्हाला मंजुरी देऊन टाका, आम्ही भीक मागून बंधा-यांची कामे करू, आता लोकांचे बोलणे खाणे सहन होत नाही, असा संताप विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी डीपीसीच्या बैठकीत सोमवारी व्यक्त केला.
बागडे म्हणाले, जिल्ह्यात अनेक ठिकाणी बंधा-यांना दरवाजे नसल्यामुळे पाणी वाहून जात आहे. शेतक-यांना ते देखवत नाही. दरवाजे बसविण्याचा निर्णय का होत नाही, चार वर्षांपासून विषय मांडतो आहे, संताप होणार नाही तर काय होणार, गिरिजा नदीला पाणी आले, दरवाजे नसल्याने ते वाहून गेले. ९ हजार दरवाजे बसवायचे असून किंमत वाढत असल्यामुळे प्रशासन मंजुरी देत नसल्याचे अधिकारी सांगत आहेत. ही कामे होत नसेल तर सांगा, आम्ही भीक मागून ती कामे करू.
जि.प. प्रशासनातर्फे सांगण्यात आले की, दरवाजे बसविणे, डागडुजीसाठी ३ कोटींची तरतूद केली आहे. २ ते ३ महिन्यांत कार्यवाही पूर्ण होईल. ५८५ पैकी ३५७ ठिकाणी दरवाजे आहेत. २५८ बंधा-यांना दरवाजे नाहीत. ३८ बंधारे जलयुक्त शिवार योजनेत आहेत. १८०० दरवाजे उपकरनिधीतून बसविण्याचा प्रयत्न आहे. ६७८ पैकी २९४ बंधा-यांत पाणी साचल्याचा दावा प्रशासनाने केला.
जि.प. अध्यक्ष देवयानी डोणगावकर म्हणाल्या, हा विषय घेतला आहे, ९ हजार गेट बसविण्याबाबत प्रक्रिया सुरू झाली आहे. जिल्हाधिकारी उदय चौधरी म्हणाले, दरवर्षी शासन दरवाजांसाठी पैसे देऊ शकत नाही. उपकरातून या कामांसाठी तरतूद केली जावी. दरम्यान आमदार निधीतून बंधाºयांच्या दरवाजांच्या कामांना मंजुरी मिळण्याचा विषय बैठकीत चर्चेला आला.
पदे उपभोगायला नसतात...
जिल्हा परिषद एवढी सुस्त का झाली, हे कळण्यास मार्ग नाही. जि.प.मधील पदे उपभोगायला नसतात. सर्वसामान्यांची कामे करण्यासाठी असतात, असा शालजोडा लगावून बागडे म्हणाले, फुलंब्री मतदारसंघातील केटीवेअरच्या कामांना मुहूर्त लागत नाही. दर बैठकीत तरतूद झाली आहे, असेच उत्तर प्रशासन देत आहे. असे असेल तर पाणी वाचणारच नाही. पाणी साचत नाही, याचे काही दु:ख यांना वाटत नाही. जि.प.तील पदे कामांसाठी असतात, पदे उपभोगायला नसतात. पैठण, गंगापूर, वैजापूर तालुक्यांत बंधारे बांधूनही पाणी साचले नाही.

Web Title: Nana was angry, 'we will do the work of the beggars'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.