नांदेड शहराने प्रदूषणाची मर्यादा ओलांडली
By Admin | Published: July 9, 2017 12:24 AM2017-07-09T00:24:18+5:302017-07-09T00:30:04+5:30
नांदेड : नांदेड शहराने सर्व बाबतीत प्रदूषणाची मर्यादा ओलांडली असून शहरवासियांना धोक्याचे जीवन जगावे लागत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : नांदेड शहराने सर्व बाबतीत प्रदूषणाची मर्यादा ओलांडली असून शहरवासियांना धोक्याचे जीवन जगावे लागत आहे. शहरातील अस्वच्छतेमुळे अगोदरच आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असताना आता प्रदूषणाची समस्या डोकेदुखी ठरली आहे़
शहरात जमा होणारा प्रचंड कचरा व पावसामुळे कचऱ्याला सुटणारी दुर्गंधी यामुळे सर्व नागरिक हैराण झाले आहेत. तसेच नळाला दुर्गंधीयुक्त पाणी येत असून या पाण्यामुळे कावीळ, जुलाब, उलट्या इ. आजारांचे रुग्ण वाढले आहेत. त्यामुळे नांदेड शहरातील सर्व आर्थिक दुर्बलांना नांदेड महानगरपालिकेने जलशुद्धीकरण यंत्र द्यावे व प्रत्येक घराला गॅस सिलिंडरचा पुरवठा करण्यात यावा. जेणेकरुन लाकडाची बचत होऊन, नांदेड शहर प्रदूषणमुक्त होईल, असा विचार डॉ. किरण चिद्रावार यांनी जनता दलाच्या बैठकीत मांडला.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी डॉ. पी. डी. जोशी- पाटोदेकर होते. बैठकीस महासचिव सूर्यकांत वाणी, उपाध्यक्ष उत्तम गायकवाड, सहसचिव बालाजी आलेवार, अर्चना पाडळकर, दोंतेवाड, शेख नदीम आदी उपस्थित होते.