नांदेड-दिल्ली विमानाचा बसणार औरंगाबादला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2017 12:18 AM2017-12-10T00:18:47+5:302017-12-10T00:18:51+5:30

एअर इंडिया लवकरच अमृतसर किंवा चंदीगडमार्गे नांदेड-दिल्ली ही विमानसेवा सुरूकरणार आहे. या विमानसेवेमुळे नांदेड विमानतळाचा औरंगाबादला आणखी एक फटका बसणार आहे. चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून दिल्लीसाठी ये-जा करणा-या विमान प्रवाशांमध्ये घट होण्याची चिंता व्यक्त होत आहे.

 Nanded-Delhi flight will hit Aurangabad | नांदेड-दिल्ली विमानाचा बसणार औरंगाबादला फटका

नांदेड-दिल्ली विमानाचा बसणार औरंगाबादला फटका

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : एअर इंडिया लवकरच अमृतसर किंवा चंदीगडमार्गे नांदेड-दिल्ली ही विमानसेवा सुरूकरणार आहे. या विमानसेवेमुळे नांदेड विमानतळाचा औरंगाबादला आणखी एक फटका बसणार आहे. चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून दिल्लीसाठी ये-जा करणा-या विमान प्रवाशांमध्ये घट होण्याची चिंता व्यक्त होत आहे.
लहान विमानतळ जोडण्यासाठी केंद्र शासनाने ‘उडान’ ही योजना सुरू केली़ यामध्ये राज्यातील सहा विमानतळांची निवड करण्यात आली होती़ त्यात नांदेडचाही समावेश आहे़ या योजनेतून सुरुवातीला नांदेड-हैदराबाद ही विमानसेवा सुरू झाली़ या सेवेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाला़ नोव्हेंबरमध्ये नांदेड-मुंबई विमानसेवेला हिरवा कंदिल मिळाला़ त्यामुळे नांदेडवरून हैदराबाद आणि मुंबई जाणाºया प्रवाशांची गैरसोय दूर झाली. आता नांदेड-दिल्ली विमानसेवा सुरू होत आहे. नांदेड आणि आजूबाजूंच्या भागातील विमान प्रवाशांची सोय होत आहे; परंतु याचा थेट परिणाम औरंगाबादवर होत आहे.
चिकलठाणा विमानतळावरून सध्या एअर इंडिया, जेट एअरवेज आणि ट्रूजेट कंपनीची विमानसेवा सुरू आहे. या सेवेमुळे औरंगाबाद शहर दिल्ली, मुंबई, हैदराबाद, तिरुपतीशी हवाई सेवेने जोडले आहे. यापूर्वी नांदेड-हैदराबाद विमानसेवा सुरू झाली, तसेच नांदेड-मुंबई विमानसेवाही सुरू आहे. यामुळे औरंगाबादेतील विमानसेवेला घरघर लागत आहे. विमानसेवेसाठी पूर्वी नांदेड येथील नागरिकांना औरंगाबादचा पर्याय होता; परंतु आता औरंगाबादऐवजी नांदेडवरूनच विमान उपलब्ध होत आहे. सध्या दिल्ली विमानसेवेसाठी लातूर, परभणी, नांदेड येथील प्रवाशांना औरंगाबादला यावे लागते; परंतु नांदेड येथून आगामी काही दिवसांत ही विमानसेवा सुरू होईल. त्यामुळे औरंगाबादला येण्याचा फेरा टळणार आहे; मात्र यामुळे औरंगाबादहून दिल्लीला जाणा-या प्रवाशांची संख्या कमी होण्याची भीती व्यक्त होत आहे.
थोडा परिणाम
नांदेड-दिल्ली विमानसेवा कधीपासून सुरू होत आहे, हे अद्याप निश्चित झालेले नाही. या विमानसेवेचा थोडाफार परिणाम होऊ शकतो. नांदेडसह लातूर, परभणीहून येणारे प्रवासी नांदेडहूनच दिल्लीला जातील; परंतु औरंगाबादेतील विमानाला अधिक फरक पडणार नाही.
-रमेश नंदे, स्टेशन मॅनेजर, एअर इंडिया

Web Title:  Nanded-Delhi flight will hit Aurangabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.