संगणकीकरणात नांदेड जि़प़ राज्यात ३१ व्या क्रमांकावर

By Admin | Published: May 28, 2014 12:38 AM2014-05-28T00:38:16+5:302014-05-28T00:42:11+5:30

नांदेड : महासंग्रामच्या संकेतस्थळावर माहिती अपलोड करण्याच्या कामात नांदेड जिल्हा परिषदेचा क्रमांक तब्बल ३१ व्या क्रमांकावर आहे़

Nanded district is the 31st in the state of computerization | संगणकीकरणात नांदेड जि़प़ राज्यात ३१ व्या क्रमांकावर

संगणकीकरणात नांदेड जि़प़ राज्यात ३१ व्या क्रमांकावर

googlenewsNext

 नांदेड : महासंग्रामच्या संकेतस्थळावर माहिती अपलोड करण्याच्या कामात नांदेड जिल्हा परिषदेचा क्रमांक तब्बल ३१ व्या क्रमांकावर आहे़ जिल्ह्यात गेल्या महिन्यात तर हे काम केवळ २ टक्के पूर्ण झाले होत अशीही धक्कादायक माहिती पुढे आली आहे़ संगणकीकरणाबाबत जिल्हा परिषदेची ही गती बघितल्यानंतर राज्याच्या ग्रामविकास विभागाने मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे फैलावर घेतले़ त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी काळे यांनीही जि़ प़ यंत्रणेला धारेवर धरताना कामाची गती वाढविण्याचे आदेश दिले आहेत़ माहिती अपलोड करण्याबाबत हलगर्जीपणा केल्याबद्दल कंधार तालुक्यातील एका ग्रामसेवकास आणि लोहा पंचायत समितीच्या संग्राम कक्षातील तालुका समन्वयकाला निलंबित करण्याची कारवाईही केली आहे़ जिल्ह्यात आजघडीला १५ लाख नोंदी होणे अपेक्षीत आहेत़ प्रत्यक्षात केवळ ५ लाख ८८ हजार नोंदीच पूर्ण झाल्या आहेत़ यात जन्माच्या नोंदी १ लाख ४३ हजार ४२२, मृत्यू नोंदी ५४ हजार ४३०, नमुना नंबर ८ च्या नोंदी ३ लाख ६१ हजार ६५२ झाल्या आहेत़ जिल्ह्यातील ही गती पाहता राज्यात नांदेड जिल्हा परिषदेचा ३१ वा क्रमांक आहे़ महासंग्रामच्या कामाला गतीमान करण्यासाठी कक्षातील समन्वयक, गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी, ग्रामसेवक व संगणक चालकांना ग्रामपंचायतनिहाय नोंदी पूर्ण करण्याच्या सूचना वारंवार जिल्हा परिषदेने दिल्या आहेत़ मात्र त्याला महासंग्रामच्या स्थानिक कर्मचार्‍याकडून केराचीच टोपली दाखविण्यात आली़ जिल्ह्यातील बहुतांश् तालुक्यात संग्राम संकेतस्थळावरील माहिती अपलोड करण्याचे काम ठप्पच आहे़ याबाबत प्रशासनाने पंचायत समितीच्या गटविकास अधिकार्‍यांना पत्र दिले़ या पत्रात काम पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या असून कारवाईचा इशाराही दिला आहे़ ज्यात तालुक्यात अपलोड करण्याचे काम मागे राहिले आहे अशा ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवक तसेच संकेतस्थळावर माहिती अपलोड करण्याचे काम करणार्‍या संगणक चालकावरही कारवाई करण्यात येणार आहे़ जिल्ह्यातील गटविकास अधिकार्‍यांनाही गांधीगिरी पध्दतीने या कामाची गती वाढविण्याच्या सूचना दिल्या आहेत़ ज्या पंचायत समितीअंतर्गत माहिती अपलोड करण्याचे काम मागे राहिले आहे अशा पंचायत समितीच्या गटविकास अधिकार्‍यांना पुष्पगुच्छ देवून त्यांचा सत्कार करण्यात आला़ परिणामी गटविकास अधिकार्‍यांनी आता या प्रकरणात आपले लक्षक ग्रामसेवकांकडे वळवले आहे़ नोंदी न करणार्‍या ग्रामसेवकांना नोटीस बजावल्या जात आहेत़ (प्रतिनिधी) महासंग्रामअंतर्गत कार्यरत विविध पदावर काम करणार्‍या कर्मचार्‍यांची मोठी लूट होत असल्याची तक्रार पुढे आली आहे़ यात प्रामुख्याने संगणक चालकांची मोठी पिळवणूक होत आहे़ संगणक चालकांना दिले जाणारे मानधन हे कागदावर वेगळे अन् प्रत्यक्ष वेगळे अशी परिस्थिती आहे़ याबाबत तक्रार करण्याचा प्रयत्न केला असता त्यांना कामावरून काढून टाकण्याची धमकी दिली जात आहे़ त्यामुळे निमूटपणे ही लूट सहन केली जात असल्याचे अनेक संगणक चालकांनी सांगितले़ महासंग्राममध्ये अन्य पदावर काम करणार्‍यांची स्थितीही याहून वेगळी नसल्याचे चित्र आहे़

Web Title: Nanded district is the 31st in the state of computerization

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.