औरंगाबादमार्गे धावणार नांदेड-पनवेल-नांदेड रेल्वे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:04 AM2021-03-18T04:04:26+5:302021-03-18T04:04:26+5:30
मध्य रेल्वेच्या साेलापूर विभागामध्ये भाळवणी ते भिगवण या रेल्वेस्थानकांदरम्यान दुहेरीकरणाच्या कामासाठी नॉन-इंटरलॉक ब्लॉक घेण्यात आला आहे. या ब्लॉकमुळे ...
मध्य रेल्वेच्या साेलापूर विभागामध्ये भाळवणी ते भिगवण या रेल्वेस्थानकांदरम्यान दुहेरीकरणाच्या कामासाठी नॉन-इंटरलॉक ब्लॉक घेण्यात आला आहे. या ब्लॉकमुळे नांदेड- पनवेल- नांदेड या विशेष रेल्वेच्या १८ फेऱ्या रद्द करण्यात आल्या होत्या. परंतु, प्रवाशांच्या आग्रहाखातर ही रेल्वे रद्द केलेल्या कालावधीत आठवड्यातून चार दिवस (सोमवारी, बुधवारी, गुरुवारी आणि शनिवारी ) तिचा नियमित मार्ग बदलून परभणी, औरंगाबाद-मनमाडमार्गे धावेल. नांदेड ते पवनेल विशेष रेल्वे १८, २०, २२, २४, २५, २७, २९ आणि ३१ मार्च रोजी परभणी, सेलू, परतूर, जालना, औरंगाबाद ( रात्री १०.०५ वाजता) , मनमाड-, कोपरगाव, पुणेमार्गे धावून पनवेल येथे पोहोचेल. पनवेल ते नांदेड विशेष रेल्वे १९, २१, २३, २५, २६, २८ आणि ३० मार्च रोजी पनवेल येथून दुपारी ४ वाजता सुटून पुणे, कोपरगाव, मनमाड, औरंगाबाद (सकाळी ६.१५) जालना, परतूर, सेलू, परभणी, पूर्णामार्गे नांदेड येथे सकाळी ११ वाजता पोहोचेल .