विद्यार्थ्यांसाठी सुरू झाले नारायणा रेसिडेन्शिअल कॅम्पस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 04:02 AM2021-03-26T04:02:07+5:302021-03-26T04:02:07+5:30
माजी महापौर नंदकुमार घोडेले, नारायणाचे संचालक डॉ. एम. एफ. मल्लिक, लायन्सचे माजी प्रांतपाल तनसुख झांबड, पारस ओस्तवाल, प्रीतेश मुणोत, ...
माजी महापौर नंदकुमार घोडेले, नारायणाचे संचालक डॉ. एम. एफ. मल्लिक, लायन्सचे माजी प्रांतपाल तनसुख झांबड, पारस ओस्तवाल, प्रीतेश मुणोत, अमोल उपाध्याय, प्रफुल्लकुमार अग्रवाल, विशाल लदनिया, राममोहन रेड्डी, प्राचार्या प्रतिमा जोसेफ, शेख हबीब यांच्या हस्ते वास्तूचे उद्घाटन झाले.
नारायणाने शहरातील शिक्षण क्षेत्रात परिवर्तनाची लाट आणली असून, नारायणा ही गुणवंत विद्यार्थी घडविणारी जणू फॅक्टरीच आहे, अशा शब्दांत घोडेले यांनी संस्थेचे कौतूक केले. जेईई मेन्स परीक्षेच्या निकालाबाबत आज औरंगाबाद शहर पुण्याच्याही पुढे असून आता या रेसिडेन्शिअल कॅम्पसमुळे लवकरच राष्ट्रीय स्तरावरील प्रथम व द्वितीय क्रमांक पटकाविणारे विद्यार्थी औरंगाबादमधून घडतील, असा विश्वास डाॅ. मलिक यांनी व्यक्त केला.
तर रेसिडेन्शिअल कॅम्पसमध्ये २५० मुले व ५० मुलींची राहण्याची व्यवस्था करण्यात आल्याचे प्राे. विशाल लदनिया यांनी सांगितले.
चौकट :
रक्तदान शिबिर आणि वृक्षारोपण
सामाजिक बांधिलकी जपत व लायन्स ब्लड सेंटरच्या मदतीने नारायणा रेसिडेन्शिअल कॅम्पस येथे रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते. तसेच यावेळी वृक्षारोपणही करण्यात आले.
चौकट :
फीमध्ये सवलत
कोरोना महामारीमुळे समाजातील सर्वच घटकांवर झालेला परिणाम पाहता नारायणा इन्स्टिट्यूटने नारायणा कोचिंग आणि ई-टेक्नो स्कूलच्या वतीने शैक्षणिक वर्ष २०२०-२१मध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना २० ते ३० टक्क्यांपर्यंत सवलत दिली असल्याची घोषणा राममोहन रेड्डी यांनी या कार्यक्रमात केली.
फोटो ओळ :
नारायणा रेसिडेन्शिअल कॅम्पसचे उद्घाटन करताना माजी महापौर नंदकुमार घोडेले, डॉ. एम. एफ. मलिक, तनसुख झांबड, विशाल लदनिया, पारस ओस्तवाल, प्रीतेश मुणोत, अमोल उपाध्याय, राममोहन रेड्डी, प्राचार्या जोसेफ आणि इतर मान्यवर.