एप्रिलमध्ये होणारी नाथषष्ठी यात्रा रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:04 AM2021-03-16T04:04:41+5:302021-03-16T04:04:41+5:30
श्री नाथषष्ठी महोत्सव एप्रिल महिन्याच्या आठवड्यात संपन्न होणार होता. या महोत्सवाकरिता राज्याच्या विविध भागातून भाविक मोठ्या संख्येने पैठण येथे ...
श्री नाथषष्ठी महोत्सव एप्रिल महिन्याच्या आठवड्यात संपन्न होणार होता. या महोत्सवाकरिता राज्याच्या विविध भागातून भाविक मोठ्या संख्येने पैठण येथे येतात. कोरोना विषाणूचा प्रसार जलदगतीने वाढतच असल्याने राज्य शासनाने प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा लागू आहे. त्यात पैठण येथील नाथषष्ठी महोत्सवात आयोजित यात्रेमध्ये अंदाजे लाखोंच्या संख्येने भाविक येतात. कोरोनाची लागण असलेला रुग्ण जर यात्रेमध्ये आला तर यामुळे कोरोनाग्रस्तांच्या संख्येत भर पडण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नाथषष्ठी यात्रा रद्द करण्यात आल्याचे आदेशात म्हटले आहे. शासनाच्या या निर्णयामुळे वारकरी संप्रदायात नाराजी पसरली आहे. गेल्यावर्षी देखील नाथषष्ठी महोत्सव रद्द करण्यात आला होता. राज्यभरातून दिंडी सोहळा घेऊन येणाऱ्या अनेक वर्षांच्या परंपरेला यंदाही खंड पडणार आहे. भाविकांना यंदाही घरी राहूनच नाथांचे दर्शन करावे लागणार आहे.