शनिवारी उच्च, जिल्हा व तालुका न्यायालयांमध्ये राष्ट्रीय लोकअदालत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:05 AM2021-09-24T04:05:57+5:302021-09-24T04:05:57+5:30
या राष्ट्रीय लोकअदालतीत मोटार अपघात, धनादेश अनादरीत प्रकरणे, वैवाहिक वाद, दिवाणी व फौजदारी प्रकरणे तसेच दाखलपूर्व प्रकरणांमध्ये विविध भ्रमणध्वनी ...
या राष्ट्रीय लोकअदालतीत मोटार अपघात, धनादेश अनादरीत प्रकरणे, वैवाहिक वाद, दिवाणी व फौजदारी प्रकरणे तसेच दाखलपूर्व प्रकरणांमध्ये विविध भ्रमणध्वनी कंपन्यांची वादपूर्व प्रकरणे, विविध राष्ट्रीयीकृत व खासगी बँका आणि वित्तीय संस्थांची कर्जवसुली व इतर वादपूर्व प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आली आहेत.
नागरिक, संबंधित पक्षकार, वकील, समाजसेवक, वित्तीय संस्था आणि इतर संबंधितांना २५ सप्टेंबर रोजीच्या लोकअदालतीत सहभाग नोंदवून जास्तीत जास्त प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्याचे आवाहन प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष श्रीपाद टेकाळे यांनी केले आहे.
ई-चलनाची प्रकरणे पहिल्यांदा तडजोडीसाठी
वाहतूक पोलिसांनी मोटार वाहन अधिनियम अंतर्गत ऑनलाईन पद्धतीने आकारलेली ई-चलनाची प्रकरणे पहिल्यांदा लोकअदालतीमध्ये तडजोडीसाठी ठेवण्यात येणार आहेत. त्यामुळे नोटीस मिळालेल्या वाहनचालकांना न्यायालयात न येता त्यांचा दावा मिटवता येणार आहे.
तसेच ज्येष्ठ नागरिक किंवा कोरोना संसर्गामुळे किंवा अपरिहार्य कारणास्तव लोकअदालतीत प्रत्यक्ष हजर राहता येणार नसलेल्या नागरिकांना आता घरुनच ई-लोकअदालतीमध्ये अटी व शर्तींसह भाग घेता येणार आहे. ज्या पक्षकारांना ई-लोकअदालतीमध्ये भाग घ्यायचा आहे, त्यांनी संबंधित न्यायालय किंवा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणकडे संपर्क करुन नावनोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
--------------------------------------------