क्रांतीदिनी चेतविला राष्ट्राभिमान! १५ हजार विद्यार्थ्यांचे औरंगाबादेत सामुहिक राष्ट्रगीत गायन

By विजय सरवदे | Published: August 9, 2022 01:57 PM2022-08-09T13:57:30+5:302022-08-09T13:58:42+5:30

विभागीय क्रीडासंकुलात सामूहिक राष्ट्रगीत गायन उत्साहात 

National pride on revolution day! 15 thousand students sing national anthem in Aurangabad | क्रांतीदिनी चेतविला राष्ट्राभिमान! १५ हजार विद्यार्थ्यांचे औरंगाबादेत सामुहिक राष्ट्रगीत गायन

क्रांतीदिनी चेतविला राष्ट्राभिमान! १५ हजार विद्यार्थ्यांचे औरंगाबादेत सामुहिक राष्ट्रगीत गायन

googlenewsNext

औरंगाबाद : आझादीच्या अमृत महोत्सवानिमित्त मंगळवारी सकाळी विभागीय क्रीडा संकुलात सुमारे १५ हजार विद्यार्थ्यांच्या समुह राष्ट्रगीत गायनाने उपस्थितांच्या मनात राष्ट्राभिमान पेटवीला. स्वराज्य महोत्सवांतर्गत क्रांती दिनी जिल्हा प्रशासनाने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

या कार्यक्रमास शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी राष्ट्रभक्तीपर विविध गीतांवर नृत्य व गायन सादर केले. यामध्ये शारदामंदीर विद्यालय, एलोरा विद्यालय, वसंतराव नाईक कनिष्ठ महाविद्यालय यांच्या चमूने राष्ट्रभक्तीपर गीतावर नृत्य सादर केले. कार्यक्रमात खासदार इम्तीयाज जलील, आमदार हरिभाऊ बागडे, ब्रिगेडियर सुनील नारायण, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, महानगरपालिका आयुक्त अभिजीत चौधरी, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश गटणे, पोलीस अधीक्षक मनीष कलावानीया, अप्पर जिल्हाधिकारी डॉ.अनंत गव्हाणे, सर्व उपजिल्हाधिकारी, तहसीलदार यांच्यासह अधिकारी, कर्मचारी, पालक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत असताना सामूहिक राष्ट्रगीत गायनाच्या या उपक्रमात सहभागी विद्यार्थ्यांनी राष्ट्रप्रेम व देशाप्रति आदर व्यक्त करण्याच्या भावनेने उत्सफूर्त प्रतिसाद दिल्याबद्दल जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सहभागी विद्यार्थ्यांचे कौतूक केले.

केंद्र सरकारच्या अग्नीवीर या सैन्यभरतीच्या उपक्रमात विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन राष्ट्रकार्यासाठी सिद्ध व्हावे. त्याचप्रमाणे देशाला मजबूत आणि विकासाकडे घेऊन जाणारी भावी पिढी राष्ट्रप्रेमाने कार्यरत राहावी. यासाठी शिक्षण, प्रशिक्षण विद्यार्थ्यांनी घ्यावे, असे आवाहन आमदार हरिभाऊ बागडे यांनी केले. तीन रंगाच्या कॅप घालून ज्याप्रमाणे तिरंगा स्वरुपात विद्यार्थी या राष्ट्रगीत कार्यक्रमात सहभागी झाले आहेत, त्याप्रमाणे आपला देश विविधतेतून एकतेचे प्रतिक आहे. पारतंत्र्यातून आपण जसे स्वतंत्र झालो तसे आता बेरोजगारी, गरिबी यांच्यामधून मुक्त होण्यासाठी भावी पिढीने एकत्र मिळून प्रयत्न करावेत, असे खासदार इम्तीयाज जलील म्हणाले.

७७ शाळा, महाविद्यालयांचा सहभाग
जिल्ह्यातील ७७ शाळा आणि महाविद्यालयांतील सुमारे १५ हजार विद्यार्थी, पालक सर्व शासकीय कार्यालयांचे विभागप्रमूख, कर्मचारी या कार्यक्रमात सहभागी झाले होते.

 

Web Title: National pride on revolution day! 15 thousand students sing national anthem in Aurangabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.