राष्ट्रीय शालेय स्क्वॅश स्पर्धा औरंगाबादेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2017 11:31 PM2017-12-04T23:31:27+5:302017-12-04T23:32:12+5:30

ऐतिहासिक औरंगाबाद शहरात प्रथमच राष्ट्रीय शालेय स्क्वॅश स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. ही स्पर्धा विभागीय क्रीडा संकुलावर ५ ते ९ डिसेंबरदरम्यान रंगणार आहे.

National School Squash Competition Aurangabad | राष्ट्रीय शालेय स्क्वॅश स्पर्धा औरंगाबादेत

राष्ट्रीय शालेय स्क्वॅश स्पर्धा औरंगाबादेत

googlenewsNext

औरंगाबाद : ऐतिहासिक औरंगाबाद शहरात प्रथमच राष्ट्रीय शालेय स्क्वॅश स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. ही स्पर्धा विभागीय क्रीडा संकुलावर ५ ते ९ डिसेंबरदरम्यान रंगणार आहे. स्पर्धेचे उद्घाटन ५ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता महसूल आयुक्त शिवानंद टाकसाळे यांच्या हस्ते होणार आहे. याप्रसंगी अप्पर जिल्हाधिकारी पी.एल. सोरमारे, पोलीस उपायुक्त विनायक ढाकणे, राज्य स्क्वॅश संघटनेचे अध्यक्ष प्रदीप खांड्रे, सचिव दयानंद कुमार, क्रीडा उपसंचालक राजकुमार माहादावाड, जिल्हा क्रीडा अधिकारी ऊर्मिला मोराळे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. उद्घाटन सोहळ्यात सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्यात अनिरुद्ध क्रीडा मंडळ यांचे ढोलपथक त्यांची कला सादर करणार आहेत.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी क्रीडा अधिकारी चंद्रशेखर घुगे, गोकुळ तांदळे, भाऊराव वीर, कृष्णा केंद्रे, लता लोंढे, उमेश बडवे, संजय वणवे, सचिन पुरी, कल्याण गाडेकर, रोहित गाडेकर, रणजित भारद्वाज, दीपक भारद्वाज, सुशील शिंदे, सुरेश मोरे, किशोर हिवराळे, राजकुमार गारोल आदी परिश्रम घेत आहेत.

Web Title: National School Squash Competition Aurangabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.