राष्ट्रीय शालेय स्क्वॅश स्पर्धेत महाराष्ट्र तिन्ही गटांत उपांत्य फेरीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2017 12:46 AM2017-12-07T00:46:21+5:302017-12-07T00:46:34+5:30
विभागीय क्रीडा संकुलावर सुरू असलेल्य राष्ट्रीय शालेय स्क्वॅश स्पर्धेत महाराष्ट्राने १४ वर्षांखालील मुले व मुली आणि १७ वर्षांखालील मुलींच्या, अशा तिन्ही गटांत उपांत्य फेरीत धडक मारली.
औरंगाबाद : विभागीय क्रीडा संकुलावर सुरू असलेल्य राष्ट्रीय शालेय स्क्वॅश स्पर्धेत महाराष्ट्राने १४ वर्षांखालील मुले व मुली आणि १७ वर्षांखालील मुलींच्या, अशा तिन्ही गटांत उपांत्य फेरीत धडक मारली.
१४ वर्षांखालील मुलांच्या गटात महाराष्ट्राने तामिळनाडूचा ३-०, दिल्लीने आसामचा ३-१, आसामने उत्तर प्रदेशचा ३-०, असा साखळी फेरीत पराभव केला. महाराष्ट्राची उपांत्य फेरीत चंदीगड आणि आसामची दिल्ली संघाविरुद्ध लढत होईल. मुलींच्या गटात महाराष्ट्राने गुजरातचा ३-१ असा पराभव केला. या गटात महाराष्ट्राची चंदीगड आणि तामिळनाडूची गुजरातविरुद्ध उपांत्य फेरीची लढत होईल.
१७ वर्षांखालील मुलींच्या गटातील साखळी सामन्यात महाराष्ट्राने दिल्लीचा ३-१, चंदीगडने गुजरातचा ३-१, मध्यप्रदेशने विद्याभारतीचा ३-०, तामिळनाडूचा गुजरातने ३-० असा पराभव केला. या गटात महाराष्ट्राची चंदीगड आणि दिल्लीचा तामिळनाडूविरुद्ध उपांत्य फेरीत धडक मारली. तत्पूर्वी, या स्पर्धेचे उद्घाटन महसूल अप्पर आयुक्त शिवानंद टाकसाळे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी अतिरिक्त जिल्हाधिकारी पी.एल. सोरमारे, विनायक ढाकणे, राज्य संघटनेचे अध्यक्ष प्रदीप खांड्रे, सचिव दयानंद कुमार, पंकज भारसाखळे, चेतन अमीन, आनंद लाहोटी, जिल्हा क्रीडा अधिकारी ऊर्मिला मोराळे, क्रीडा अधिकारी चंद्रशेखर घुगे, जिल्हा संघटनेचे सचिव रणजित भारद्वाज, भाऊराव वीर यांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन अमृत बिºहाडे यांनी केले. आभार गोकुळ तांदळे यांनी मानले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी कृष्णा केंद्रे, लता लोंढे, उमेश बडवे, संजय वणवे, सचिन पुरी, कल्याण गाडेकर, रोहित गाडेकर, सुरेश मोरे, किशोर हिवराळे, दीपक भारद्वाज, सुशील शिंदे, राजकुमार गारोल, पिंटू राय आदी परिश्रम घेत आहेत.