राष्ट्रीय सेवा योजना शिबीर उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2019 06:25 PM2019-01-12T18:25:49+5:302019-01-12T18:26:22+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ संलग्नित राजीव गांधी महाविद्यालय व विद्याधन महाविद्यालय औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने गेवराई कुबेर येथे मंगळवारी राष्ट्रीय सेवा योजना शिबीर संपन्न झाले.
करमाड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ संलग्नित राजीव गांधी महाविद्यालय व विद्याधन महाविद्यालय औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने गेवराई कुबेर येथे मंगळवारी राष्ट्रीय सेवा योजना शिबीर संपन्न झाले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे राज्यशास्त्र अभ्यासमंडळाचे अध्यक्ष डॉ. नवनाथ आघाव हे उपस्थित होते. तर अध्यक्षस्थानी म्हणून प्रा. सत्यप्रेम घुमरे होते.
डॉ. आघाव म्हणाले की, ग्रामीण भागात विकासासाठी उत्पादक प्रकल्प विकसित करण्याची गरज आहे. ग्रामीण भागाचा विकास आणि विविध प्रकल्प यावर त्यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला प्राचार्य डॉ. अश्विनकुमार चिंचोलीकर, सरपंच दिगंबर कुबेर, रामेश्वर कुबेर, प्रा. परवेज शेख,भगवान कुबेर यांच्यासह १५० विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. नरेश डहाळे, भाऊसाहेब ढवळे, आशिष काळे,भास्कर पठाडे, रमेश कचरे,मदन गहिरे,भगवान बोचरे,प्रशांत माठे,प्रा. शेंडगे,प्रा. मालकर,प्रा. श्रीसुंदर यांनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक प्रा. लक्ष्मीकांत दांडगे यांनी तर तर आभार समाधान निकम यांनी मानले.