राष्ट्रीय टेनिस व्हॉलीबॉल स्पर्धेत महाराष्ट्राला दुहेरी मुकुट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2019 12:50 AM2019-02-05T00:50:49+5:302019-02-05T00:51:04+5:30
मध्य प्रदेशातील डाबरा येथे नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय टेनिस व्हॉलीबॉल स्पर्धेत महाराष्ट्राने युथ गटात दुहेरी मुकुट पटकावला, तर मिनी गटात उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. या स्पर्धेत महाराष्ट्राने युथ गटात मुले व मुलींच्या गटातील अंतिम सामन्यात गुजरातला पराभूत केले, तर मिनी गटातील मुलींच्या गटात महाराष्ट्रला गुजरातकडून अंतिम सामन्यात पराभव पत्करावा लागला.
औरंगाबाद : मध्य प्रदेशातील डाबरा येथे नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय टेनिस व्हॉलीबॉल स्पर्धेत महाराष्ट्राने युथ गटात दुहेरी मुकुट पटकावला, तर मिनी गटात उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. या स्पर्धेत महाराष्ट्राने युथ गटात मुले व मुलींच्या गटातील अंतिम सामन्यात गुजरातला पराभूत केले, तर मिनी गटातील मुलींच्या गटात महाराष्ट्रला गुजरातकडून अंतिम सामन्यात पराभव पत्करावा लागला.
सुवर्णपदक पटकावणारा महाराष्ट्राचा युथ संघ मुले : सिद्धार्थ लिपणे, ऋषिकेश बेकरे, विजय बोडके, संतोष नोकवाल, राहुल धोतरे, सौरभ झांबरे, किशन धोतरे. मुलींचा संघ : प्राची कडने, अनुष्का पुजारी, साक्षी भुर्के, भाग्यश्री गव्हाडे, श्रद्धा नवघरे. प्रशिक्षक : सतीश नावाडे, व्यवस्थापक : बाळासाहेब नवघरे.
मिनी गटात रौप्यपदक जिंकणारा संघ : सना महात, राणी आंबी, नाजनीन मोमीन, पूजा पोंक्षे, तेजस्विनी शिंदे, रिया पाटील. प्रशिक्षक : राहुल पटेकर. विजेतेपद पटकावणाऱ्या संघाचे हरिभाऊ लहाने, नितीन लोहट, व्यंकटेश वांगवाड, आनंद खरे, गणेश माळवे, किशोर चौधरी, माधव शेजूळ, प्रा. नागेश कान्हेकर, जिल्हा क्रीडा अधिकारी कलीमउद्दीन फारुकी, शैलेंद्र गौतम, सी. टी. नावाडे, अनिल कुलकर्णी आदींनी अभिनंदन केले आहे.