‘राष्ट्रवादी’चे जेलभरो

By Admin | Published: September 14, 2015 11:58 PM2015-09-14T23:58:30+5:302015-09-15T00:34:25+5:30

औरंगाबाद : दुष्काळाने होरपळणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी, तात्काळ मदत घोषित करावी व अन्य मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे सोमवारी

'Nationalist' Jail Bhrow | ‘राष्ट्रवादी’चे जेलभरो

‘राष्ट्रवादी’चे जेलभरो

googlenewsNext


औरंगाबाद : दुष्काळाने होरपळणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी, तात्काळ मदत घोषित करावी व अन्य मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे सोमवारी जिल्ह्यात ठिकठिकाणी रास्ता रोको करून जेलभरो आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे अनेक ठिकाणी ट्रॅफिक जाम होऊन वाहने अडकून पडली. पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेऊन नंतर सोडून दिले.
वैजापूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे वैजापूर येथे हायवे चौफुलीवर जेलभरो आंदोलन करण्यात आले. पंचायत समितीचे माजी उपसभापती, अ‍ॅड. प्रतापराव निंबाळकर,अजय पा. चिकटगावकर, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष दिनकर पवार यांच्या नेतृत्वाखाली झाले. सकाळपासूनच शेतकरी आणि नागरिकांनी हायवे चौफुलीवर बैलगाड्यांसह गर्दी केली होती. यावेळी साईनाथ मतसागर, धीरजसिंग राजपूत, अल्ताफ बाबा, एराज शेख, प्रेम राजपूत, अक्रम पठाण, रवी अण्णा पाटणे, मंजाहारी गाडे, संदीप पवार, काळू पाटील वैद्य, कृष्णा ठोंबरे, प्रभाकर बारसे, शिवाजी आधुडे, रामदास टेके, बाळू पाटील शेळके, धीरज राजपूत, गणेश चव्हाण, प्रकाश शेळके, विजय पवार, प्रताप धोर्डे, प्रेम राजपूत, सागर गायकवाड, अमृत शिंदेपाटील, नाना गुंजाळ, अनिल सोनावणे, संजय जाधव, दिलीप सोमवंशी, जगन्नाथ काळे, अमोल बावचे, गोविंदराव गायकवाड आदींसह युवक, कार्यकर्ते, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपविभागीय अधिकारी लक्ष्मीकांत साताळकर, तहसीलदार अभय बेलसारे, पोलीस निरीक्षक बापूसाहेब महाजन, पोलीस कॉ. रवींद्र काळे यांच्यासह मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
खुलताबाद : राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे ज्येष्ठ नेते विलास चव्हाण, तालुकाध्यक्ष राजू वरकड यांच्या नेतृत्वाखाली खुलताबाद येथे औरंगाबाद-धुळे महामार्गावर जेलभरो करण्यात आल्याने या मार्गावरील वाहतूक तासभर खोळंबली होती. पोलिसांनी ३०० आंदोलनकर्त्यांना अटक करून नंतर सुटका केली.
या आंदोलनात माजी नगराध्यक्ष अ‍ॅड. कैसरोद्दीन, महिला जिल्हाध्यक्षा सुनीता चव्हाण, पुंजाजी नलावडे, शरफूभाई, मनोज श्रीखंडे, तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर दुधारे, शहराध्यक्ष मुकेश मालोदे, दीपक खोसरे, ज्ञानेश्वर मतकर, नितीन जाधव, गजानन फुलारे, भगवान कामठे, निसार पठाण, शंकर आधाने, जावेद पटेल, संजय आधाने,
भाऊसाहेब जाधव, फिरोज पठाण, रावसाहेब जामदार, सखाराम गोल्हार, जिल्हा उपाध्यक्ष दिनेश सावजी, विजय जाधव, पवन दांडेकर, माजी उपसभापती राजू भागडे, बाजार समितीचे सभापती अनिल चव्हाण, उपसभापती नानासाहेब चंद्रटिके, माजी उपनगराध्यक्ष नवनाथ बारगळ, नगरसेवक इसाक कुरेशी, माजी जि. प. सभापती भीमराव खंडागळे, रमेश करपे, कैलास हरणे, अक्षय खरोटे आदींसह पदाधिकारी हजर होते.
आंदोलनात शेतकरी व कार्यकर्ते बैलगाडीसह सहभागी झाले होते. यावेळी कार्यकर्त्यांनी राज्य शासनाच्या विरोधात घोषणा दिल्या. तहसीलदार बालाजी शेवाळे यांना तालुकाध्यक्ष राजू वरकड यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले. पोलीस निरीक्षक शिवलाल पुरभे यांनी आंदोलनकर्त्यांना अटक करून तासाभरानंतर सुटका केली.
कन्नड : जेलभरो आंदोलनासाठी जमलेल्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उदयसिंग राजपूत यांच्या नेतृत्वाखाली बसस्थानकासमोर रास्ता रोको करण्याचा प्रयत्न करीत असताना पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलीस ठाण्यात कायदेशीर प्रक्रियेनंतर सोडून देण्यात आले. अ‍ॅड. प्रसन्ना पाटील, अ‍ॅड. चंदू शहा, नगरसेवक सुनील पवार, अहेमद अली आदींसह ३५ ते ४० कार्यकर्ते आंदोलनात सहभागी होते.
फुलंब्री : तालुक्यातील गणोरी फाट्यावर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सोमवारी जेलभरो आंदोलन करण्यात आले. जि. प. सदस्या अनुराधा चव्हाण, माजी जि. प. सदस्य जितेंद्र जैस्वाल यांच्या नेतृत्वाखाली औरंगाबाद -जळगाव राज्य रस्त्यावर गणोरी फाटा येथे काही काळ रास्ता रोको करण्यात आला.
४यानंतर काही कार्यकर्त्यांना पोलिसांच्या वाहनात बसून ठाण्यात नेले. आंदोलनात सभापती माधुरी गाडेकर, संतोष तांदळे, खुशालराव पवार, रामचंद्र काळे, सुदाम तायडे, भिकनराव मोटे, तेजराव चव्हाण, कृष्णा सुदाम पवार, धनंजय महाजन, महादू काळे, भगवान भिवसने, सुनील तायडे, अय्यूब पटेल यांची उपस्थिती होती.

Web Title: 'Nationalist' Jail Bhrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.