गॅस दरवाढीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 04:02 AM2021-02-07T04:02:22+5:302021-02-07T04:02:22+5:30
दोन चुली मांडून त्यावर महिलांनी चपात्या भाजल्या. वारे मोदी तेरा खेल सस्ती दारु महंगा तेल, या मोदी सरकारचा करायचं ...
दोन चुली मांडून त्यावर महिलांनी चपात्या भाजल्या. वारे मोदी तेरा खेल सस्ती दारु महंगा तेल, या मोदी सरकारचा करायचं काय, खाली मुंडकं वर पाय, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय असो, इंधन व गॅस दरवाढ करणाऱ्या केंद्र सरकारचा निषेध असो अशा घोषणा देऊन क्रांती चौक परिसर या महिलांनी दणाणून सोडला होता.
शहर राष्ट्रवादी महिला काँग्रेस व जिल्हा राष्ट्रवादी महिला काँग्रेस यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या या आंदोलनात जिल्हाध्यक्षा छाया जंगले पाटील, शहराध्यक्षा मेराज पटेल, राष्ट्रीय सचिव वीणा खरे, प्रतिभा वैद्य, वैशाली पाटील, प्राजक्ता पाटील, सलमा बानो, मंजूषा पवार, विद्या मोरे, अनीसा बेगम, झेबुन्निसाबाजी, नाजेमा, सलमा बेगम,शकिला खान, कौसर खान, मुन्नीबाजी,शमा परवेज, कविता होळकर,रजनी कांबळे, संध्या शिरसाट आदींनी या आंदोलनात सहभाग घेतला.
गॅस दरवाढीमुळे सर्वसामान्य गृहिणी त्रस्त झाली आहे.त्यातच इंधन दरवाढ.त्यामुळे मोठ्या प्रमाणावर महागाईचा भडका उडणार असून जगणे असह्य होत चालले आहे.मोदी सरकारने वेळीच ही दरवाढ रोखावी अन्यथा लोक रस्त्यावर उतरून आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही,असा इशारा यावेळी वीणा खरे,छाया जंगले व मेराज पटेल यांनी दिला.