राष्ट्रीयकृत बँका पीककर्जासाठी उदासीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2017 12:08 AM2017-09-01T00:08:33+5:302017-09-01T00:08:33+5:30

सातत्याने दुष्काळाच्या फेºयात अडकेल्या शेतकºयांना पीककर्ज वेळेत आणि सुलभरित्या वाटप करण्याच्या राज्य शासनाच्या सूचना असल्या तरी त्या सूचना, आदेशांना डावलून शेतकºयांना पीककर्ज देण्यात बँकांकडून उदासीनताच दाखवली जात आहे़ जिल्ह्यात आजघडीला केवळ २३ टक्के पीककर्ज वाटप झाले आहे़

Nationalized banks depressed for crop loans | राष्ट्रीयकृत बँका पीककर्जासाठी उदासीन

राष्ट्रीयकृत बँका पीककर्जासाठी उदासीन

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड: सातत्याने दुष्काळाच्या फेºयात अडकेल्या शेतकºयांना पीककर्ज वेळेत आणि सुलभरित्या वाटप करण्याच्या राज्य शासनाच्या सूचना असल्या तरी त्या सूचना, आदेशांना डावलून शेतकºयांना पीककर्ज देण्यात बँकांकडून उदासीनताच दाखवली जात आहे़ जिल्ह्यात आजघडीला केवळ २३ टक्के पीककर्ज वाटप झाले आहे़
जिल्ह्यातील शेतकºयांना पीककर्ज वाटपाची जबाबदारी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, राष्ट्रीयकृत बँका आणि ग्रामीण बँकावर सोपविली आहे़ जिल्ह्यात १ लाख ५२ हजार ४२ शेतकºयांना पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट होते़ त्यातील ८७ हजार ८८ शेतकºयांना पीककर्ज उपलब्ध झाले आहे़ इतर शेतकरी मात्र पीककर्जापासून वंचितच राहिले आहेत़ पीककर्ज वाटपात नांदेड जिल्हा सहकारी बँकेने चांगली कामगिरी करताना खरीप हंगामासाठी जिल्ह्यातील ६१ हजार शेतकºयांना १३७ कोटी ४२ लाख रूपये कर्ज वाटप केले आहे़ जिल्हा बँकेच्या पीककर्ज वाटपाची टक्केवारी ही ९८़२८ टक्के इतकी आहे़ तर जिल्ह्यात राष्ट्रीयकृत बँकांनी केलेल्या पीककर्ज वाटपाची टक्केवारी ही केवळ १४ टक्के तर ग्रामीण बँकेची जवळपास २८ टक्के इतकी टक्केवारी आहे़ राष्ट्रीयकृत बँकांनी १८ हजार २४८ शेतकºयांना १६७ कोटी ५४ लाख आणि ग्रामीण बँकामधून ७ हजार ६५९ शेतकºयांना ५५ कोटी १५ लाखांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे़
कर्जमाफी मिळणार असल्याची शेतकºयांना अपेक्षा होती़ त्यामुळे आपल्याकडील कर्ज शेतकºयांनी भरण्यास टाळाटाळ केली होती़ त्यात दुष्काळी परिस्थितीचाही शेतकºयांना मोठा फटका बसला होता़ परिणामी थकीत कर्ज तशीच राहिली़ पूर्वीचे कर्ज न भरल्याने राष्ट्रीयकृत बँकांनी चालू वर्षात नवे पीककर्ज देण्यास टाळाटाळ केल्याचे सांगितले जात आहे़ शासनाच्या नवनव्या आदेशामुळेही पीककर्ज वाटपाची टक्केवारी खाली आली आहे़

Web Title: Nationalized banks depressed for crop loans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.