नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा ५२ केंद्रांवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:03 AM2021-07-28T04:03:27+5:302021-07-28T04:03:27+5:30
औरंगाबाद : जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा ११ ऑगस्टला होणार असून, ती जिल्ह्यातील ५२ केंद्रांवर आयोजित करण्यात आली आहे. ...
औरंगाबाद : जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा ११ ऑगस्टला होणार असून, ती जिल्ह्यातील ५२ केंद्रांवर आयोजित करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना या परीक्षेद्वारे इयत्ता सहावीमध्ये प्रवेश मिळणार असून, परीक्षेसाठी १२ हजार ६०६ विद्यार्थी प्रविष्ट झाले आहेत. बुधवारी ११ ऑगस्टला सकाळी ११.३० ते १.३० या वेळेत ही परीक्षा घेण्यात येणार आहे. जिल्ह्यात या शाळांमध्ये परीक्षा घेतली जाईल, शिशू विहार, औरंगपुरा, शारदा मंदिर हायस्कूल, स. भु. प्राथमिक शाळा, स. भू. हायस्कूल, उज्ज्वलाताई पवार इंग्लिश स्कूल, सातारा, डॉ. देसरडा पब्लिक स्कूल, बायजिपुरा, गोदावरी हायस्कूल, हडको, बळिराम पाटील हायस्कूल, सिडको, चाटे इंग्लिश स्कूल, सातारा, धर्मवीर संभाजी विद्यालय, सिडको, गुरू तेगबहाद्दूर हायस्कूल, उस्मानपुरा, सेंट फ्रान्सिस हायस्कूल, होलीक्रॉस इंग्लिश हायस्कूल, छावणी, रॉयल ओकास वर्ल्ड स्कूल, देवळाई चौक, संत जनार्दन स्वामी विद्यालय, वेरुळ, गुरुदेव एसव्हीएम, वेरुळ, जवाहर नवोदय विद्यालय, कन्नड, शिवाजी कॉलेज, कन्नड, न्यू हायस्कूल, कन्नड, सावित्रीबाई फुले कन्या प्रशाला, कन्नड, साने गुरुजी विद्यालय, कन्नड, माणिकराव पालोदकर हायस्कूल, फर्दापूर, नॅशनल उर्दू स्कूल, सिल्लोड, नॅशनल मराठी स्कूल, सिल्लोड, संत एकनाथ विद्यालय, स. भु. हायस्कूल, भराडी, शिवाजी विद्यालय, सिल्लोड, स्वामी विवेकानंद विद्यालय, सिल्लोड, लिटिल वंडर स्कूल, सिल्लोड, रामकृष्ण हायस्कूल, जि. प. कन्या प्रशाला, पैठण, नाथ हायस्कूल, पैठण, स. भु. हायस्कूल, बिडकीन, जवाहर माध्यमिक विद्यालय, पाचोड, मिश्रीलाल पहाडे इंग्लिश स्कूल, पैठण, आर्य चाणक्य विद्यामंदिर, पैठण, हरिश्चंद्र लघाने पाटील हायस्कूल, बिडकीन, धूत कन्या प्रशाला, गंगापूर, न्यू हायस्कूल, लासूर स्टेशन, भैरवमल तनवाणी हायस्कूल, वाळूज, राजा शिवाजी हायस्कूल, बजाजनगर, गजानन विद्यामंदिर, रांजणगाव, सेंट मोनिका इंग्लिश स्कूल, वैजापूर, करुणा निकेतन पब्लिक स्कूल, वैजापूर, स्वामी विवेकानंद विद्यालय, गारज, संत बहिणाबाई हायस्कूल, शिवूर, न्यू हायस्कूल, वैजापूर, संत सावता गुरुकुल विद्यालय, फुलंब्री, गोरक्ष विद्यालय, खामगाव, जि. प. हायस्कूल, फुलंब्री आणि समता विद्यामंदिर, फुलंब्री.