नवरात्रोत्सवाच्या तयारीला वेग

By Admin | Published: September 23, 2014 11:07 PM2014-09-23T23:07:24+5:302014-09-23T23:23:26+5:30

हिंगोली : गणेशोत्सवानंतर हर्षोल्हासात साजऱ्या होणाऱ्या नवरात्रोत्सवाची तयारी वेगाने सुरू झाली.

Navratri festival preparation speed | नवरात्रोत्सवाच्या तयारीला वेग

नवरात्रोत्सवाच्या तयारीला वेग

googlenewsNext

हिंगोली : गणेशोत्सवानंतर हर्षोल्हासात साजऱ्या होणाऱ्या नवरात्रोत्सवाची तयारी वेगाने सुरू झाली. आकर्षक मखर उभारणीपासून ते सजावटीपर्यंत प्रत्येक बाबीत वैैशिष्ट्य पूर्णतेसाठी हिंगोलीतील जवळपास ३५ मंडळे रात्रंदिवस राबत आहेत. दुसरीकडे दांडियाच्या तयारीसाठी वाद्याचे आवाज कानी पडत आहेत. त्यातच मागील आठवड्यापासून खरेदीसाठी बाजारात रेलचेल सुरू झाल्याने सुरक्षायंत्रणा दक्ष झाली झाली. जुन्या मंदिरांची रंगरंगोटी होऊ लागली. परिणामी, पावसाअभावी उदासीन झालेल्या नागरिकांमध्ये नवरात्रीनिमित्त उत्साह संचारल्याचे दिसून येत आहे.
प्रामुख्याने गणेशोत्सवात पुरूषांचा अधिक बोलबाला असतो. तर नवरात्रीत महिलांना अधिक वाव असतो. पूजेच्या बाबतीत नेम पाळावा लागत असल्याने महिलांना संधी असते. पूर्वापार ही परंपरा चालत आल्याने हिंगोलीतही या उत्सवाला पर्वणीच असते. शहरातील प्रत्येक गल्लीबोळात मूर्तीची स्थापना केली जाते. मागील वर्षी ३८ मंडळांनी देवीची स्थापना केली होती. यंदाही ३१ मंडळांनी मूर्तीच्या स्थापनेसाठी पोलिसांनाकडे परवानगी मागितली. तत्पूर्वीच प्रतिवर्षीच्या नियोजित ठिकाणी मखर उभारणीला सुरूवात केली. वेगवेगळ्या प्रतिकृतीच्या आकारातील आकर्षक मखर उभारणीकडे प्रत्येक मंडळाचा कल दिसतो. विद्युत रोषणाई, रंगीत पडदे, गेट, स्टेज उभारणीचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले. बाजारात देवीच्या अनेकविध रूपातील मूर्ती विक्रीसाठी उपलब्ध झाल्या आहेत. साधारण हजारापासून वीस हजारांपर्यंतच्या मूर्तींच्या यात समावेश आहे. गतवर्षीपेक्षा कलाकारांनी रंगरंगोटी अधिक मेहनत घेतल्याचे पाहवयास मिळते. २५ सप्टेंबर रोजी होणाऱ्या घटस्थापनेपासून शहर प्रकाशात उजळून निघणार आहे. (वार्ताहर)
पेहरावाविना दांडियाला मजा येत नसल्याचे युवक सांगतात. यामुळे दांडियात युवक व युवतींच्या अंगावर आकर्षक फॅन्सी कपडे पाहवयास मिळतात. प्रामुख्याने या उत्सवासाठी खास कपडे विकत घेणाऱ्यांचीही संख्या मर्यादित आहे.
तगडा बंदोबस्त ठेवणार
नवरात्रोत्सवानिमित्त जिल्ह्यात १३ पोलिस ठाण्यांतर्गत ५१२ नवदुर्गा गणेश मंडळाकडून मूर्तीची स्थापना करण्यात येणार आहे. तसेच ८ शारदा मंडळांकडूनही देवीची स्थापना केली जाणार आहे. यासाठी या पोलिस ठाण्यांतर्गत बंदोबस्तासाठी नियोजन करण्यासाठी नुकतीच बॉम्बशोधक पथकाने पाहणी केली. विधानसभा निवडणुकीची धामधूम असतानाही विसर्जन मिरवणुकीचे मार्ग, त्यात येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी पाहणी करण्यात आली आहे. रात्रीची गस्त पोलिसांकडून केली जाणार आहे. त्यासाठी वेगळे नियोजन करण्यात आले आहे.
जुन्या मंदिरांकडे रीघ
नवरात्रोत्सव जसजसा जवळ येऊ लागला तसतसा भाविकांचा ओढा शहरातील देवींच्या जुन्या मंदिरांकडे दिसू लागला. प्रामुख्याने दुर्गामातेची आराधना या उत्सवात केली जात असतानाही कालीमाता देवीवर भाविकांची श्रद्धा राहिली आहे. गोलंदाज गल्लीतील मसई माता, सातमाता मंदिर, मोचीपुरा भागातील दुर्गामाता मंदिर आणि महाकाली माता मंदिरात गर्दी होऊ लागली.
पावसाच्या सरी
हिंगोली :शहर व परिसरात आज सायंकाळी चारच्या सुमारास अचानक पावसाच्या सरी कोसळल्या. मात्र या शिडकाव्याचा पिकांवर कोणताही परिणाम होणार नसून एका मोठ्या पावसाची गरज शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे.

Web Title: Navratri festival preparation speed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.