नवरात्रोत्सवातील अन्नछत्रेही आचारसंहितेच्या कचाट्यात

By Admin | Published: September 13, 2014 11:35 PM2014-09-13T23:35:24+5:302014-09-13T23:35:24+5:30

उस्मानाबाद : महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेचा नवरात्रोत्सव २५ सप्टेंबरपासून सुरू होत असून, या कालावधीत पायी येणाऱ्या भाविकांसाठी तुळजापूरकडे येणाऱ्या रस्त्यांवर

Navratri festival's food chain is also in practice | नवरात्रोत्सवातील अन्नछत्रेही आचारसंहितेच्या कचाट्यात

नवरात्रोत्सवातील अन्नछत्रेही आचारसंहितेच्या कचाट्यात

googlenewsNext



उस्मानाबाद : महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेचा नवरात्रोत्सव २५ सप्टेंबरपासून सुरू होत असून, या कालावधीत पायी येणाऱ्या भाविकांसाठी तुळजापूरकडे येणाऱ्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात अन्नछत्र उभारले जातात. परंतु निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू केली असल्याने यातील राजकीय लोकांच्या अन्नछत्रावर आता बंधने आली आहेत. राजकीय नेत्यांनी अशी अन्नछत्रे उभारल्यास संबंधितांवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिला.
शासनाने विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर शनिवारी जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यांनी पत्रकार परिषद घेऊन निवडणुकीच्या तयारीबाबतची माहिती दिली. यावेळी निवडणूक उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे, उपजिल्हाधिकारी भालचंद्र चाकूरकर, जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी के. बी. कोंडेकर आदींची उपस्थिती होती. डॉ. नारनवरे म्हणाले, जिल्ह्यात चार विधानसभा मतदार संघ असून, यातील उस्मानाबाद, तुळजापूर व परंडा हे खुले तर उमरगा मतदारसंघ अनुसुचित जातीसाठी राखीव आहे. उमरगा विधानसभा मतदार संघासाठी उपविभागीय अधिकारी रविंद्र गुरव, तुळजापूरसाठी जिल्हा पुरवठा अधिकारी बी.एस. घुगे, उस्मानाबादसाठी उपविभागीय अधिकारी अभिमन्यू बोधवड तर पंरडयासाठी उपविभागीय अधिकारी संतोष राऊत यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
जिल्ह्यात बी.एल.ओ मार्फत मतदारांना व्होटर स्लिप वाटप करण्यात येत असल्याचे सांगून जिल्ह्यात एकही मतदान केंद्र अतिसंवेदनशील नसल्याचे डॉ. नारनवरे म्हणाले. लोकसभेसाठी सर्वच मतदारांना टपाली मतपत्रिका पाठविण्यात आल्या होत्या. मात्र, अनेकांचे पत्ते चुकीचे असल्याने या निवडणुकीत टपाली मतदान कमी झाले. मात्र, विधानसभा निवडणुकीसाठी सैन्य दलातील तसेच शासकीय नोकरदारांचे बदलले पत्ता संबधित खात्याकडून नव्याने घेण्यात आले असल्याचे ते म्हणाले. (प्रतिनिधी)
निवडणूक विभागाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार २० सप्टेंबर रोजी निवडणुकीची अधिसूचना प्रसिध्द होणार आहे. यानंतर २७ सप्टेंबर रोजी नामनिर्देशनपत्र सादर करणे तर २९ सप्टेंबर रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी होणार आहे. नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची शेवटची तारीख १ आॅक्टोबर असून, १५ आॅक्टोबर रोजी मतदान तर १९ रोजी मतमोजणी होणार असल्याचे पत्र परिषदेत सांगण्यात आले. मतदार यादीत कुणाची नावे चुकलेली असल्यास किंवा नावनोंदणी करायची राहिली असल्यास त्यांनी विहित नमुन्यातील फॉर्म भरून देऊन ती करून घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.

विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी २ हजार ७०० बॅलेट युनिट व २ हजार २०० कंट्रोल युनिट एवढ्या व्होटींग मशीन प्राप्त झाल्या असून, सदरील मशिनची प्रथमस्तरीय तपासणी प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
विधानसभेसाठी १२ लाख २१ हजार २५८ मतदार असून, यात ६ लाख ५७ हजार ५१६ पुरुष, ५ लाख ६३ हजार ७२७ स्त्री व १५ इतर मतदारांचा समावेश आहे. याशिवाय चार मतदारसंघासाठी १ हजार ३५९ मतदान केंद्रांची निर्मिती केली जाणार आहे.
४उमरग्यात ३०१, तुळजापूर ३७०, उस्मानाबाद ३४५ तर परंडयात ३४३ असे एकुण चार विधानसभा मतदारसंघासाठी एकूण १ हजार ३५९ मतदान केंद्रे आहेत.

Web Title: Navratri festival's food chain is also in practice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.