राष्ट्रवादी, सेना-भाजपचे शेतकरी एकता पॅनल

By Admin | Published: March 14, 2016 12:02 AM2016-03-14T00:02:12+5:302016-03-14T00:19:27+5:30

नांदेड : नांदेड कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत राष्ट्रवादी, शिवसेना-भाजपाने शेतकरी एकता पॅनल तयार केले आहे़ शेतकऱ्यांच्या हितासाठी एकत्र येत निवडणूक लढवित आहोत

NCP, Sena-BJP's Farmer Integration Panel | राष्ट्रवादी, सेना-भाजपचे शेतकरी एकता पॅनल

राष्ट्रवादी, सेना-भाजपचे शेतकरी एकता पॅनल

googlenewsNext

नांदेड : नांदेड कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत राष्ट्रवादी, शिवसेना-भाजपाने शेतकरी एकता पॅनल तयार केले आहे़ शेतकऱ्यांच्या हितासाठी एकत्र येत निवडणूक लढवित आहोत, अशी माहिती पॅनल प्रमुख भगवानराव पाटील आलेगावकर यांनी रविवारी पत्रपरिषदेत दिली़ आमदार हेमंत पाटील, आ़ प्रतापराव पाटील चिखलीकर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष माजी आ़ बापूसाहेब गोरठेकर, शहर जिल्हाध्यक्ष डॉ़ सुनील कदम, माजी खा़भास्करराव पाटील खतगावकर, माजी आ़ओमप्रकाश पोकर्णा यांची प्रमुख उपस्थिती होती़
आलेगावकर म्हणाले, बाजार समित्या सक्षम करण्यासाठी मुदखेड, अर्धापूर येथे स्वतंत्र बाजार समिती असावी, अशी आमची मागणी आहे़ सत्तेचे विकेंद्रीकरण करून शेतकऱ्यांचे हित जोपासता येईल़ अर्धापूर भागात केळीचे उत्पादन अधिक आहे़ मात्र, मार्केट नांदेडला असल्याने शेतकऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागतो़
काँग्रेसला आव्हान देण्यासाठी आम्ही सर्वजण एकत्र लढत असल्याचे आ़ हेमंत पाटील यांनी सांगितले़ तर आ़ चिखलीकर म्हणाले, आमच्या पॅनलमध्ये सेना - भाजपा - राष्ट्रवादी असा कोणताही भेदभाव नाही़
माजी आ़ पोकर्णा यांनी बाजार समितीच्या विद्यमान संचालक मंडळावर गैरव्यवहाराचे आरोप केले़ डॉ़सुनील कदम म्हणाले, शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी शेतकरी एकता पॅनल रिंगणात उतरविला आहे़ दरम्यान, बापूसाहेब गोरठेकर, माजी खा़ भास्करराव पाटील खतगावकर यांनीही मनोगत व्यक्त केले़
पॅनलमधील उमेदवार जाहीर
सहकारी संस्था मतदारसंघ-भगवानराव पाटील आलेगावकर, रमेश पावडे, मोतीराम मोरे, दत्ता पाटील पांगरीकर, रमेशराव धुमाळ, भीमराव देशमुख, गंगाराम गोदगे, पद्मीनबाई शिंदे, कान्होपात्रा कंकाळ, विठ्ठल पाटील नांदुसेकर, शंकर वापटकर, ग्रामपंचायत मतदारसंघ - नारायण कदम, बाबूराव पावडे, पुष्पाबाई बारसे, अजय सरपाते, व्यापारी मतदारसंघ - ओमप्रकाश पोकर्णा, सदाशिव देशमुख तर हमाल- मापाडी मतदारसंघातून सूर्यकांत स्वामी यांना उमेदवारी देण्यात आली आहे़ पत्रपरिषदेस धोंडू पाटील, अ‍ॅड़किशोर देशमुख, प्रवीण गायकवाड, अशोक सूर्यवंशी, भुजंग पाटील डक, मिलिंद देशमुख, दीपक पावडे, विनय सगर, सरपंच नारायण कदम यांच्यासह पॅनलमधील उमेदवार उपस्थित होते़ (प्रतिनिधी)

Web Title: NCP, Sena-BJP's Farmer Integration Panel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.