औरंगाबाद विद्यापीठ अधीसभेच्या पदवीधर गटात राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित उत्कर्ष पॅनेलची विजयी घौडदौड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2017 07:29 AM2017-12-08T07:29:08+5:302017-12-08T07:41:55+5:30

'अभाविप' प्रणित विद्यापीठ विकास मंचचा राखीव प्रवर्गातील 5 जागांवर दारुण पराभव

NCP's Pranit Utkshah panel's winning streak in Aurangabad University superannuation graduate group | औरंगाबाद विद्यापीठ अधीसभेच्या पदवीधर गटात राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित उत्कर्ष पॅनेलची विजयी घौडदौड

औरंगाबाद विद्यापीठ अधीसभेच्या पदवीधर गटात राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित उत्कर्ष पॅनेलची विजयी घौडदौड

googlenewsNext

औरंगाबाद: डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीत दुसऱ्या टप्प्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सतीश चव्हाण प्रणित उत्कर्ष पॅनलच्या उमेदवारांची विजयी घौडदौड सुरू आहे. राखीव प्रवर्गातील 5 जागांचे निकाल शुक्रवारी सकाळपर्यंत जाहीर झाले. यातील 5 ही जागा उत्कर्ष पॅनलच्या उमेदवारांनी मोठ्या फरकाने जिंकल्या आहेत. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या राखीव प्रवर्गातील उमेदवारांना दारुण पराभव स्वीकारावा लागला.

उत्कर्ष पॅनलच्या विजयी उमेदवारांमध्ये अनुसूचित जाती प्रवर्गात प्रा. सुनील मगरे, अनुसूचित जमातीमध्ये सुनील निकम, ओबीसींमध्ये सुभाष राऊत, व्हीजेएनटी गटात संजय काळबांडे आणि महिला गटात शीतल माने यांनी विद्यापीठ विकास मंचाच्या उमेदवारांवर दणदणीत विजय मिळवला आहे. विजयी उमेदवारांनी ठरवून दिलेला कोटा पूर्ण करत अतिरिक्त मते घेत विजय मिळवला आहे. उर्वरित खुल्या प्रवर्गातील मतमोजणीला सकाळी 7 वाजता सुरुवात झाली आहे. या गटातील निकाल दुपारपर्यंत हाती येण्याची शक्यता आहे. 

अधिसभेच्या राखीव प्रवर्गात पात्र ठरलेली मते, अपात्र मते आणि विजयासाठी ठेवलेला कोटा दिलेला आहे. तसेच त्याखाली उमेदवांनी घेतलेली मते ही देण्यात आली आहेत.


अनुसूचित जाती प्रवर्ग

पात्र मते - 14445

अपात्र मते- 2465

कोटा-7223


उमेदवारांना पहिल्या पसंतीची मिळालेली मते


प्रा.सुनिल मगरे

8504

पंकज भारसाखले

1904

बाबासाहेब भालेराव

820

प्रशांत पवार

1097

वाहुळकर

534

प्रकाश इंगळे

760

घाटे

280

शिरीष कांबळे

337

उत्तम कांबळे

209


अनुसूचीत जमाती प्रवर्ग


पात्र मते- 13913

अपात्र मते- 2997

कोटा- 6957


उमेदवारांना पहिल्या पसंतीची मिळलेली मते


सुनील निकम

9421

भागवत बरडे

1656

राजू सूर्यवंशी

2836


व्हिजेएनटी प्रवर्ग


पात्र मते- 13858

अपात्र मते- 3052

कोटा- 6930


उमेदवारांना पहिल्या पसंतीची मिळालेली मते


संजय काळबांडे

8041

काकासाहेब शिंदे

2546

पूनम सलामपूरे

1157

राखमाजी कांबळे

1159

हनुमंत गुट्टे

965



ओबीसी प्रवर्ग


पात्रमते - 14010

अपात्रमते - 2900

कोटा- 7006


उमेदवारांना पहिल्या पसंतीची मिळालेली मते


सुभाष राऊत

8923

तुषार वखरे

1124

राजीव काळे

3533

वीरकर

430



महिला प्रवर्ग


पात्र मते- 14041

अपात्र मते- 2869

कोटा- 7021


उमेदवारांना पहिल्या पसंतीची मिळलेली मते


शीतल माने 

7407

योगीता तौर 

 4095

पल्लवी बोर्डे

 810

अनघा देशमुख

 962

सुचेता इंगळे 

767

(ही आकडेवारी मतदान निर्णय अधिकाऱ्यांनी घोषणा करतांना लिहून घेतलेली आहे.)


 

Web Title: NCP's Pranit Utkshah panel's winning streak in Aurangabad University superannuation graduate group

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.