राष्ट्रवादी काँग्रेसचा मूक मोर्चा
By Admin | Published: July 14, 2017 12:22 AM2017-07-14T00:22:40+5:302017-07-14T00:23:53+5:30
नांदेड : कोपर्डी प्रकरणातील आरोपींना फाशी देऊन पीडित मुलीला न्याय द्यावा, या मागणीसाठी गुरुवारी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने मूक मोर्चा काढण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : कोपर्डी प्रकरणातील आरोपींना फाशी देऊन पीडित मुलीला न्याय द्यावा, या मागणीसाठी गुरुवारी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने छत्रपती चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मूक मोर्चा काढण्यात आला.
राष्ट्रवादी महिला आघाडीच्या शहर जिल्हाध्यक्षा कृष्णा मंगनाळे , ग्रामीणच्या जिल्हाध्यक्षा प्रांजली रावणगावकर यांच्या नेतृत्वाखाली मूक मोर्चा काढण्यात आला़ कोपर्डी घटनेतील पीडित मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र रस्त्यावर उतरला आणि शासनाने हे प्रकरण फास्ट्र ट्रॅक कोर्टात चालवून तीन महिन्यात आरोपींना शिक्षा देण्याचे आश्वासन दिले होते़ परंतु, या घटनेला एक वर्ष पूर्ण होऊनही पीडित मुलीला न्याय मिळाला नाही़ उलट राज्यभरात मुली-महिलांवरील अत्याचाऱ्यांच्या घटनांमध्ये वाढच झाली असून ही बाब पुरोगामी महाराष्ट्राची मान खाली घालणारी असल्याचे निवेदनात म्हटले आहे़ तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कायदा व सुव्यवस्था सांभाळण्यात अपयशी ठरल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला़ मोर्चात सभापती डॉ़शीला कदम, शिवनंदा आलेगावकर, कल्पना पाटील डोंगळीकर, रेखा आहिरे, प्रज्ञा पवार, ज्योती खरबे, वाघमारे, कमल लांडगे, कौर, महमदी पटेल, कांचन भिसे, जया काटकर, कमल मंगनाळे, सुरेंद्र कौर, शोभा सावंत, सुनीता शिंदे, सुनंदा वाघ, सिंधू लिमगे, शहर जिल्हाध्यक्ष डॉ़सुनील कदम, गणेश तादलापूरकर, डॉ़मुजाहिद खान, संतोष देशमुख, सरफराज अहमद, गंगाधर कवाळे, अझहर कुरेशी, शेख मुस्सा, सुजीत म्याकलवाड, संतोष दगडगावकर, कन्हैया कदम, प्रकाश वाघमारे, रोहित ठाकूर, शेख सिकंदर आदीही सहभागी होते.