रासायनिक खतांच्या दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचे निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:03 AM2021-05-18T04:03:27+5:302021-05-18T04:03:27+5:30
निवेदनात नमूद केले की, केंद्र सरकारने रासायनिक खतांच्या एका गोणीमागे ५०० ते ७०० रुपयांची दरवाढ केली आहे. यामुळे ...
निवेदनात नमूद केले की, केंद्र सरकारने रासायनिक खतांच्या एका गोणीमागे ५०० ते ७०० रुपयांची दरवाढ केली आहे. यामुळे शेतकऱ्यांचे अक्षरश: कंबरडे मोडणार आहे. कोरोना, लॉकडाऊन, अवकाळी पाऊस यामुळे शेतकरी अगोदरच हवालदिल झाले आहेत. त्यात खतांच्या किमतीत दरवाढ करून केंद्राने शेतकऱ्यांवर अन्याय केला आहे. पीएम किसान योजनेचे दोन हजार शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करून आणि काही तासांत खतात दरवाढ करून ते काढून घेतले आहे. मोदी सरकारचा हा अन्याय आम्ही खपवून घेणार नसल्याचा इशारा निवेदनात दिला आहे.
यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष राहुल डकले, युवक तालुकाध्यक्ष विजय मोरे, किसान सेल तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर मते, गणेश सोनवणे, मतीन पटेल, श्रीराम बोडखे, नजमोद्दीन पटेल आदी उपस्थित होते.
फोटो कॅप्शन : फुलंब्रीच्या तहसीलदार शीतल राजपूत यांना निवेदन देताना राहुल डकले, विजय मोरे, ज्ञानेश्वर मते.
170521\ncp photo_1.jpg
फुलंब्रीच्या तहसीलदार शीतल राजपूत यांना निवेदन देताना राहुल डकले, विजय मोरे, ज्ञानेश्वर मते.