निवडणुकीसाठी राष्ट्रवादीची व्यूहरचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2017 12:18 AM2017-09-08T00:18:44+5:302017-09-08T00:18:44+5:30

जिल्हा नियोजन समितीच्या निवडणूक रणधुमाळीला प्रारंभ झाला असून ३५ सदस्यपदांसाठी ५ सप्टेंबर पासून अर्ज भरण्यास प्रारंभ झाला आहे़ या निवडणुकीत जिल्हा परिषदेच्या २८ सदस्यांना निवडून देण्यात येणार आहे़ त्यासाठी राष्ट्रवादीने रणनीती आखली असून काँग्रेस सोबत आघाडी करायची का स्वतंत्रपणे निवडणूक लढायची, याबाबतचा निर्णय जि़प़ उपाध्यक्ष तथा गटनेते समाधान जाधव यांच्यावर सोपविण्यात आला आहे़

NCP's strategy for elections | निवडणुकीसाठी राष्ट्रवादीची व्यूहरचना

निवडणुकीसाठी राष्ट्रवादीची व्यूहरचना

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड: जिल्हा नियोजन समितीच्या निवडणूक रणधुमाळीला प्रारंभ झाला असून ३५ सदस्यपदांसाठी ५ सप्टेंबर पासून अर्ज भरण्यास प्रारंभ झाला आहे़ या निवडणुकीत जिल्हा परिषदेच्या २८ सदस्यांना निवडून देण्यात येणार आहे़ त्यासाठी राष्ट्रवादीने रणनीती आखली असून काँग्रेस सोबत आघाडी करायची का स्वतंत्रपणे निवडणूक लढायची, याबाबतचा निर्णय जि़प़ उपाध्यक्ष तथा गटनेते समाधान जाधव यांच्यावर सोपविण्यात आला आहे़
जिल्हा परिषदेत काँग्रेस, राष्ट्रवादीची आघाडी असून अध्यक्षपद काँग्रेसकडे तर उपाध्यक्षपद राष्ट्रवादीकडे आहेत़ त्यामुळे जिल्हा नियोजन समिती निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादीची आघाडी होणार की निवडणूक लढविणार, असा प्रश्न निर्माण झाला़ यासंदर्भात राष्ट्रवादीच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे़ राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बापूसाहेब गोरठेकर यांनी या निवडणुकीत निर्णय घेण्याची जबाबदारी जि़ प़ उपाध्यक्ष समाधान जाधव यांच्यावर सोपवली आहे़ या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीतील सर्व गट - तट एकत्र झाले असून जिल्हाध्यक्ष गोरठेकर, आ़ प्रदीप नाईक, माजी आ़ शंकरअण्णा धोंडगे यांच्या सूचनेनुसार ७ सप्टेंबर रोजी गटनेता समाधान जाधव यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादीच्या १० सदस्यांची बैठक घेण्यात आली़ यावेळी निवडणुकीच्या अनुषंगाने व्यूहरचना आखली़ काँग्रेससोबत सन्मानाने आघाडी झाली तर ठीक नाही तर निवडणूक लढविण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला़ यासंदर्भात गटनेता समाधान जाधव यांनी निर्णय घ्यावा, असा निर्णय सदस्यांनी घेतला़
आघाडी संदर्भात चर्चा करण्यासाठी काँग्रेसचे निमंत्रण आले असून राष्ट्रवादीचे गटनेता समाधान जाधव यांच्यासोबत बोलणी करण्यात येणार आहे़ यावेळी बिनविरोध सदस्य निवडून देण्याचा प्रस्ताव ठेवला जाणार आहे़ अन्यथा राष्ट्रवादीकडून एकला चलो रे चा अवलंब केला जाणार आहे़ दरम्यान, गुरूवारी राष्ट्रवादीच्या १० सदस्यांनी उमेदवारी अर्ज घेतले़ बैठकीस सभापती दत्तात्रय रेड्डी, मधुमती कुंटूरकर, अ‍ॅड़ विजय धोंडगे, मधुकर राठोड, सुनयना जाधव, संगीता मेकलवार, सुनंदा दहिफळे, संगीता जाधव, ललिता यलमगोंडे यांची उपस्थिती होती़

Web Title: NCP's strategy for elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.