निलंग्यातील कक्ष काचेचा बंगला़़!
By Admin | Published: August 17, 2014 12:32 AM2014-08-17T00:32:01+5:302014-08-17T01:04:44+5:30
गोविंद इंगळे , निलंगा निलंगा येथील बसस्थानकात हिरकणी कक्ष काचाचे बनविण्यात आले आहे़ महिला प्रवाशांची कुचंबना होणार नाही, यासाठी स्वतंत्रपणे कक्ष उभारण्याचे आदेश
गोविंद इंगळे , निलंगा
निलंगा येथील बसस्थानकात हिरकणी कक्ष काचाचे बनविण्यात आले आहे़ महिला प्रवाशांची कुचंबना होणार नाही, यासाठी स्वतंत्रपणे कक्ष उभारण्याचे आदेश असल्याने तत्कालीन अतिउत्साही आगार प्रमुखांनी चक्क काचेचा वापर करून कक्ष उभा केला आहे़
चोहोबाजूंनी काचा लावण्यात आल्या असल्याने एकही महिला कक्षात बसली नाही़ गेल्या दोन वर्षांपासून हिरकणी कक्षाचा कुणी वापर केला नसल्याने याठिकाणी पार्सल व आरक्षण काम सुरू करण्यात आले आहे़ हिरकणी कक्षाची पाहणीसाठी आलेल्यांना पार्सलचे हे दुकान पहावयास मिळते़ येथील स्थानक प्रमुखांनी हिरकणी कक्षाची जागा भाड्याने दिली आहे़ हिरकणी कक्षाला प्रतिसाद मिळत नसल्याने भाड्याने देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे़ महिला प्रवाशांची सोय व्हावी म्हणून हिरकणी कक्षाची योजना आणलेल्या राज्य परिवहन महामंडळाने मोठी अपेक्षा करुन कक्ष स्थापन केले. निलंगा आगारात उत्साही आगार प्रमुखाने तात्काळ ही योजना राबविण्याची सोय केली. मात्र महिलांसाठी असलेला हा कक्ष नेमका कसा असावा, हे कळले नसल्याने काचेचे घर उभे करण्यात आले.