उच्चशिक्षणात लिंगभाव संवेदनशीलतेची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 04:05 AM2021-02-14T04:05:21+5:302021-02-14T04:05:21+5:30
स्वाती देहाडराय : नोकऱ्यांमध्ये स्त्रियांचे प्रमाण कमीच औरंगाबाद : केवळ वाचन आणि लिखाण आले म्हणजे शिक्षण घेतले असे नाही, ...
स्वाती देहाडराय : नोकऱ्यांमध्ये स्त्रियांचे प्रमाण कमीच
औरंगाबाद : केवळ वाचन आणि लिखाण आले म्हणजे शिक्षण घेतले असे नाही, तर ती सर्वार्थाने विकसित होण्याची प्रक्रिया आहे. त्याचा परिणाम हा प्रत्येकाच्या व्यक्तिमत्त्व विकासावर होत असतो. त्यामुळे या जडणघडणीमध्ये लिंगभाव संवेदनशीलता असणे गरजेचे आहे, असे मत पुणे येथील क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्त्री अभ्यास केंद्राच्या प्राध्यापिक डॉ.स्वाती देहाडराय यांनी केले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील स्त्री अभ्यास केंद्राच्या वतीने आयोजित ‘लिंगभाव चर्चा विश्व’ या दहा दिवशीय व्याख्यानमालेत त्या बोलत होत्या. डॉ.देहाडराय म्हणाल्या, उच्च शिक्षणात जरी स्त्रिया दिसत असल्या, तरी नोकरीच्या क्षेत्रात त्या मोठ्या प्रमाणात अदृश्य असल्याचे आजचे वास्तव आहे. त्यातही कनिष्ठ जाती अथवा आदिवासी भागातून येणाऱ्या स्त्रियांचे प्रमाण हे आजही कमी आहेत. शिक्षणातील सेवा देणाऱ्या क्षेत्रांमध्ये ज्यात नर्सिंग, रिसेप्शनसारख्या क्षेत्रात स्त्रिया असल्याचे चित्र आहे.
यावेळी पाहुण्यांचा परिचय व्याख्यानमालेच्या समन्वयक प्राध्यापक अश्विनी मोरे यांनी करून दिला व आभार मानले. या कार्यक्रमास केंद्राच्या संचालक डॉ.स्मिता अवचार, तसेच राज्यातील विविध महाविद्यालयांमधून डॉ.संबोधी देशपांडे, डॉ.प्रतिभा अहिरे, डॉ.सुजाता चव्हाण, डॉ.मीना गोपाळ, डॉ.सविता शेटे, डॉ.संगीता देसाई आदींसह मोठ्या संख्येने संशोधक विद्यार्थी उपस्थित होते.