शहरात ‘झीरो कचरा सप्ताह’ राबविण्याची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2017 12:47 AM2017-10-01T00:47:41+5:302017-10-01T00:47:41+5:30
चौकाचौकात साचलेल्या कच-यामुळे शहराला बकाल स्वरूप आले आहे. त्यामुळे केवळ एक दिवस निमित्त म्हणून स्वच्छता मोहीम घेण्याऐवजी आठवडभर झीरो कचरा सप्ताह राबवून संपूर्ण शहर स्वच्छ करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी शिवाजीराव जोंधळे यांनी शनिवारी केल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : चौकाचौकात साचलेल्या कच-यामुळे शहराला बकाल स्वरूप आले आहे. त्यामुळे केवळ एक दिवस निमित्त म्हणून स्वच्छता मोहीम घेण्याऐवजी आठवडभर झीरो कचरा सप्ताह राबवून संपूर्ण शहर स्वच्छ करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी शिवाजीराव जोंधळे यांनी शनिवारी केल्या.
स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत जालना शहरात महात्मा गांधी जयंतीनिमित्त दोन आॅक्टोबरला पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्या उपस्थितीत शहर स्वच्छता मोहीम व जनजागृती महारॅली काढण्यात येणार आहे. या संदर्भातील नियोजन करण्यासाठी शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली. जिल्हाधिकारी शिवाजीराव जोंधळे, नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल, उपनगराध्यक्ष राजेश राऊत, उपजिल्हाधिकारी राजेश जोशी, मुख्याधिकारी संतोष खांडेकर, तहसीलदार विपिन पाटील यांची या वेळी प्रमुख उपस्थिती होती. जिल्हाधिकारी जोंधळे म्हणाले, की दोन आॅक्टोबरला केवळ फोटोसेशन पुरती मोहीम न राबवता शहर खºया अर्थाने स्वच्छ होईल यासाठी व्यापक नियोजन करणे गरजेचे आहे. त्यासाठी या मोहिमेत शहरातील सामाजिक संस्था, सेवाभावी गु्रप, व्यापाºयांचा सहभाग वाढविण्याच्या सूचना त्यांनी केल्या. नगराध्यक्षा गोरंट्याल म्हणाल्या, की शहरात दररोज ८० टन कचरा निघतो, पैकी ६० टन कचºयाचे दररोज संकलन केले जाते. उर्वरित २० टन कचºयाची विल्हेवाट लावण्याचा प्रश्न पालिकेसमोर आहे. खासगी एजन्सीची नेमणूक करून हा कचरा उचलला जाईल. यापुढे रस्त्यावर व्यवसाय करणाºया फेरीवाल्यांनी आपला कचरा स्वत: संकलित करून कचराकुंडीत टाकावा. दुकाने, मंगल कार्यालये, हॉटेलचालकांनी रस्त्यावर अस्वच्छता करू नये, असे केल्यास संबंधितांवर थेट कारवाई करण्याच्या सूचना नगराध्यक्षांनी मुख्याधिकाºयांना दिल्या. मुख्याधिकारी खांडेकर यांनी स्वच्छता विभागात कर्मचारी संख्या कमी असल्याचा मुद्दा उपस्थित केला. उपलब्ध कर्मचाºयांबरोबर खाजगी एजन्सीच्या माध्यमातून स्वच्छता राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. बांधकाम साहित्य रस्त्यावर टाकणाºयांवर कारवाई करावी, अशी मागणी बैठकीत करण्यात आली.