चित्रपट साक्षरता वाढविणे गरजेचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2017 12:56 AM2017-09-11T00:56:46+5:302017-09-11T00:56:46+5:30
सध्याचा काळ हा माध्यमांचा काळ असून माध्यम मोठ्या प्रमाणावर आपल्यावर येऊन आदळत आहेत. ही माध्यमे अर्थकारण आणि सत्ताकारणाशी जोडलेली असल्याने चिकित्सक विचार करणे आवश्यक आहे. चित्रपट हेही एक माध्यम असून तो पाहताना निरिक्षण, चित्र वाचन, विश्लेषण ही दृष्टी असणे आवश्यक आहे. म्हणून चित्रपट पाहण्यासाठी चित्रपट साक्षरता वाढविणे गरजेचे आहे, असे मत मुंबई येथील प्रा. अभिजीत देशपांडे यांनी व्यक्त केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : सध्याचा काळ हा माध्यमांचा काळ असून माध्यम मोठ्या प्रमाणावर आपल्यावर येऊन आदळत आहेत. ही माध्यमे अर्थकारण आणि सत्ताकारणाशी जोडलेली असल्याने चिकित्सक विचार करणे आवश्यक आहे. चित्रपट हेही एक माध्यम असून तो पाहताना निरिक्षण, चित्र वाचन, विश्लेषण ही दृष्टी असणे आवश्यक आहे. म्हणून चित्रपट पाहण्यासाठी चित्रपट साक्षरता वाढविणे गरजेचे आहे, असे मत मुंबई येथील प्रा. अभिजीत देशपांडे यांनी व्यक्त केले.
गणेश वाचनालय आणि जनशक्ती वाचक चळवळीच्या वतीने १०, ११ व १२ सप्टेंबर रोजी आयोजित केलेल्या बी.रघुनाथ महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी देशपांडे बोलत होते. चित्रपट कसा समजून घ्यावा, या विषयावर त्यांनी व्याख्यान दिले. दीपप्रज्ज्वलन आणि बी.रघुनाथांच्या प्रतिमा पूजनाने महोत्सवाचे उद्घाटन झाले. यावेळी प्रा.विश्वाधार देशमुख, अॅड.अनंतराव उमरीकर यांची उपस्थिती होती.
देशपांडे म्हणाले, चित्रपट हे माध्यम १८९५ ला फ्रान्समध्ये जन्माला आले. विशिष्ट लेखनाला वाचक नसतील तर ते बंदिस्त होते. तसेच चित्रपटाचेही आहे. दृश्यकला समजून घेणारा रसिक महत्त्वाचा असतो. मुळातच सिनेमा हा माध्यमांशी संबंधित शब्द आहे. तसेच चित्रपट हा पूर्णपणे तंत्रज्ञानावर आधारित असून ते वाणिज्यप्रधान माध्यम आहे. चित्रपट ही एक समूहकला आहे. आपण सर्वांनी थ्रीडी चित्रपट पाहिले पण आता फोरडी चित्रपट येत आहेत. येत्या दहा वर्षात चित्रपट सृष्टी पूर्णपणे बदलणार आहे. आपण माध्यमातून जग पाहणार आहोत. त्यामुळे चित्रपट हा आता पाम थिएटरमध्ये उपलब्ध झाला आहे. यासाठी कथा, नायक, पद्धती, गाणी आणि भव्यता म्हणजे चित्रपट समजून घेणे असे नाही.
चित्रपटात विषय आणि दृश्यरचना महत्त्वाची आहे. हे सांगताना त्यांनी माध्यम साक्षरतेची पंचसूत्रीही सांगितली. यासाठी निरिक्षण, वाचन आणि विश्लेषण या तीन गोष्टी महत्त्वाच्या असल्याचे त्यांनी सांगितले. श्रीकांत उमरीकर यांनी सूत्रसंचालन केले.