आंतरविद्याशाखीय संशोधनाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2017 12:43 AM2017-09-15T00:43:28+5:302017-09-15T00:43:28+5:30

भाषा संस्कृती, धर्म आणि तत्वज्ञानातील मौलिक विचार लक्षात घेता आंतरविद्याशाखीय संशोधन समोर आले तर जगाला ते मार्गदर्शक ठरतील, असे मत डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी संचालक तथा भाषा तज्ज्ञ प्रा.डॉ.ए.जी. खान यांनी व्यक्त केले.

The need for interdisciplinary research | आंतरविद्याशाखीय संशोधनाची गरज

आंतरविद्याशाखीय संशोधनाची गरज

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : भाषा संस्कृती, धर्म आणि तत्वज्ञानातील मौलिक विचार लक्षात घेता आंतरविद्याशाखीय संशोधन समोर आले तर जगाला ते मार्गदर्शक ठरतील, असे मत डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी संचालक तथा भाषा तज्ज्ञ प्रा.डॉ.ए.जी. खान यांनी व्यक्त केले.
येथील श्री शिवाजी महाविद्यालयात भाषा व वाणिज्य, व्यवस्थापन शाखेच्या वतीने ११ सप्टेंबर रोजी राज्यस्तरीय उद्बोधन शिबीर पार पडले. यावेळी भाषा संशोधनातील नव पैलू या विषयावर मार्गदर्शन करताना खान बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.बाळासाहेब जाधव तर उद्घाटक म्हणून मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे महाविद्यालय विकास अधिकारी प्राचार्य आर.टी. देशमुख, उपप्राचार्य डॉ.विजया नांदापूरकर, डॉ.मदन परतूरकर आदींची उपस्थिती होती. खान म्हणाले, उच्च शिक्षणातील समान संधी ग्रामीण भागापर्यंत अजूनही पोहचली नाही. जे शिक्षण पोहचले त्यात गुणवत्ता नाही. त्यामुळे आजच्या समाजाला कौशल्यपूर्ण शिक्षणाची खरी गरज असल्याचे त्यांनी सांगितले. संशोधन ही दीर्घ चालणारी प्रक्रिया आहे. यातून रचनात्मक दृष्टीने समाजमन बदलले पाहिजे, हे संशोधकांनी समोर ठेवून अध्यापन, अध्ययन केले पाहिजे, असे ते म्हणाले. याप्रसंगी नांदेड येथील डॉ.सी.के. हरनावळे, डॉ.प्रभाकर हरकळ, डॉ.एम.एन. सोंडगे, उपप्राचार्य डॉ.सुरेश पैठणकर, डॉ.बळीराम धापसे, डॉ.अजय देशमुख यांनीही मार्गदर्शन केले.

Web Title: The need for interdisciplinary research

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.