संवेदनशील वकील आणि न्यायाधीशांची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2018 12:15 AM2018-03-04T00:15:37+5:302018-03-04T00:15:43+5:30
न्यायमूर्ती कृष्णा अय्यर, न्या. पी.एन. भगवती, न्या. व्यंकट चलय्या यांच्यासारखे न्यायाधीश तक्रारीसाठी आलेल्या पत्रालाही जनहित याचिका समजून ती केस लढायचे. या सगळ्या मंडळींमध्ये कायद्याचा अभिनव अर्थ काढण्याची ताकद होती; पण आता मात्र जनहित याचिकांच्या दृष्टीने पत्रांकडे पाहणाºया न्यायाधीश आणि वकिलांची संख्या कमी झाली आहे, हे आपले दुर्दैव आहे, असे प्रतिपादन अॅड. असीम सरोदे यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : न्यायमूर्ती कृष्णा अय्यर, न्या. पी.एन. भगवती, न्या. व्यंकट चलय्या यांच्यासारखे न्यायाधीश तक्रारीसाठी आलेल्या पत्रालाही जनहित याचिका समजून ती केस लढायचे. या सगळ्या मंडळींमध्ये कायद्याचा अभिनव अर्थ काढण्याची ताकद होती; पण आता मात्र जनहित याचिकांच्या दृष्टीने पत्रांकडे पाहणाºया न्यायाधीश आणि वकिलांची संख्या कमी झाली आहे, हे आपले दुर्दैव आहे, असे प्रतिपादन अॅड. असीम सरोदे यांनी केले.
मैत्र मांदियाळी प्रतिष्ठान आयोजित व समर्पण प्रतिष्ठान प्रस्तुत ‘तरुणाईच्या वेगळ्या वाटा’ या जाहीर मुलाखतीच्या कार्यक्रमाचे शनिवारी संत तुकाराम नाट्यगृह येथे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मनोज गोविंदवार यांनी अॅड. असीम सरोदे, डॉ. दिगंत व अनघा आमटे, एव्हरेस्टवीर रफिक शेख आदींशी संवाद साधला.
यावेळी अॅड. सरोदे म्हणाले की, आजच्या वकिलांनी आम्हालाच कायदा कळतो, असा आविर्भाव सोडून देण्याची आणि सर्वसामान्य माणसाने कायदा समजून घेण्याची गरज आहे. कायदा हा सामान्य, शक्तिहीन, ताकद नसलेल्या माणसांना न्याय देण्यासाठी आहे; पण आपल्याकडे शहाण्या माणसाने कोर्टाची पायरी चढू नये असे म्हणतात. त्यामुळे दीडशहाणी मंडळीच कोर्टात गर्दी करतात आणि त्यांना न्याय मिळतो. कचºयाच्या समस्या, रस्त्यांवरील खड्डे यासारखे प्रश्न म्हणजे मानवी हक्कांचे उल्लंघन असल्याचे अॅड. सरोदे यांनी स्पष्ट केले. औरंगाबादमध्ये स्वच्छता सर्वेक्षण जाहिरातीचे फलक सगळीकडे दिसतात; पण या शहरात कचरा वर्गीकरण, कचरा प्रक्रिया यासारखी कोणतीही यंत्रणा नसताना या जाहिरातींवर पैसा खर्च करणे मूर्खपणाचे असल्याचेही ते म्हणाले.
बाबा आमटेंचा समाजसेवेचा वारसा पुढे चालविणारे डॉ. दिगंत व डॉ. अनघा आमटे या दाम्पत्यानेही उपस्थितांशी मनमोकळा संवाद साधला. लहानपणी हेमलकसाला राहताना जगात इतर भौतिक सुविधा असतात, हे आम्हाला माहितीच नव्हते. त्यामुळे आमचे बालपण फार कष्टात गेले, असे आम्हाला मुळीच वाटत नाही. उलट शहरातल्या बंदिस्त जीवनापेक्षा आम्ही खूप मोकळे आणि समृद्ध जीवन जगलो याचा आनंद होतो, असे त्यांनी स्पष्ट केले.
शिवस्मारकास विरोध
लोकप्रिय भावनांना तयार क रणे हे येथील राजकारण्यांचे इंधन आहे. त्याचाच परिपाक म्हणून आज समुद्रात शिवस्मारक उभे राहत आहे. येथे बिनडोक लोकांचे समूह असून, त्यांना पुतळे दिले, की ते नाचत बसतात आणि मूलभूत अडचणी आपोआप विसरतात, हे येथील राजकारण्यांनी पक्के जाणले आहे. मात्र, पुतळ्यांपेक्षा येथील माणसे उभी राहण्यासाठी प्रयत्न करायची गरज आहे, अशा रोखठोक भाषेत अॅड. सरोदे यांनी शिवस्मारकास विरोध दर्शविला.